रक्षाबंधन स्पेशल : पद्मश्री राहीबाई यांनी या भाजपा मंत्र्याकरिता स्वतःचा हाताने बनवली जगावेगळी राखी.

रक्षाबंधन सन म्हणजे बहिण भाऊ यांच्यातील प्रेमाचा, एकाच बंधनाचा, सुरक्षितेचा. आपल्या भावासाठी एक बहिण संपूर्ण बाजार फिरून राखी खरेदी करून आणते, हा दिवस भावासाठी पण स्पेशल असतो, बहिणीसाठी काय गिफ्ट घ्यायचे काय नाही तिला काय आवडते काय नाही हे भावाला सांभाळायचे असते. अश्याच प्रकारे या बातमीमध्ये एका बहिणीने तिच्या भावा करता स्वतःच्या हाताने आणि जगावेगळी राखी बनवली आहे. पाहूया बातमी सविस्तर.
ही बातमी राजकारणातली आहे मात्र राजकारणातला आपलेपणा दाखवणारी ही बातमी आहे. ही बातमी आहे ज्यांना अजित पवार चंपा म्हणतात आणि अजित पवार यांनी आपल्याला असं म्हणावं अशी पूर्णपणे जे त्यांना परवानगी देतात, ते असं म्हटल्यानंतर मला आवडतं असं म्हणतात ते म्हणजेच भाजपाचे नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्या बद्दलची.
यांची आगळीवेगळी रक्षाबंधन साजरी झाली ती म्हणजे चंद्रकांत दादा पाटील यांची मानलेली बहीण म्हणजे राहीबाई पोपेरे, अकोले तालुक्यातील पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी आपल्या मानलेल्या भावासाठी म्हणजेच मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासाठी बीज राखी बनवून एक अनोखी भेट आपल्या या भावाला दिली आहे. यामध्ये भात, नागली, वरई, काकडी, भोपळा, यासारख्या विविध प्रकारच्या गावरान बियांचा वापर करून त्यांनी या राख्या स्वतःच्या हाताने बनवल्या आहेत.
चंद्रकांत दादांना बंधू मानलेल्या पद्मश्री राहीबाई यांनी बीज बँकेच्या स्वरूपात महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांना भाऊ बनवले आहे. राहीबाई यांचे प्रेमापोटी हजारो शेतकरी त्यांना आपली बहीण मानतात. या शेतकऱ्यांच्या प्रेमापोटी आणि त्यांना मनस्वी आदर राखण्यासाठी त्यांनी बीज राख्यांची निर्मिती केली. आपल्या भावाला म्हणजेच मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना त्यांनी ही राखी पाठवली आहे.