हृदयद्रावक : मेल्यानंतर ही इथला त्रास संपत नाही, तिरडी वाहून जाऊ नये म्हणून लोकांनी पाहा काय केलं

देशांमध्ये आपण ७५वा स्वातंत्र्यदिन साजरा करतो. मात्र 75 वर्षांत काही गोष्टी घडलेला नाही. यात काही गोष्टी बदलेल्या नाहीयेत. स्वतंत्र भारतामध्ये मूलभूत सुविधा सुद्धा इथल्या जनतेला मिळत नाहीयेत.
हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहून तुमचं मन सुन्न होईल, कारण जगताना तर अनेक यातना होत असतात. जगताना दिवसेंदिवस दैनंदिनच्या गोष्टी आहेत याचा सामना करावा लागतो. मात्र गेल्यानंतरसुद्धा इथल्या यातना संपत नाही. तर मेल्यानंतरसुद्धा इथला त्रास संपत नाही. याची प्रचीती किंवा दर्शन घडवणारा हा उत्तम व्हिडिओ आहे.
या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता कुटुंबातील अंत्यसंस्कारासाठी मृतदेह खांद्यावर घेऊन जात आहेत. त्यांच्या गळ्यापर्यंत पाणी आहे अशा परिस्थितीत सुद्धा मृतदेह घेऊन जावे लागत आहे. व स्मशानघाट नाल्याच्या दुसर्या बाजूला आहे जिथे जाण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय, त्या ठिकाणी रस्ता नाहीये त्यामुळे कुटुंबावरती अशी वेळ आली. या पावसाचं पाणी पार्थिवावर पडू नये म्हणून कुटुंबीयांनी केळीच्या पानाचा आधार घेतला.
संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतंय याप्रकरणी एका स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांना अजून कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही अशी माहिती समोर येतेय. चार वर्षांपूर्वी एक योजना आणली होती ज्यामध्ये मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना अंत्यसंस्कारासाठी दोन हजार रुपये मिळणार होते असे आश्वासन दिलं होतं. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर या योजनेचा काय फायदा झाला असा सवाल आता उपस्थित केला जातोय.
हा व्हिडीओ ओडीसा इथला आहे एका ट्विटर अकाउंट वर हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात याचे चर्चा होऊ लागल्या.