सोयगाव पोलीस ठाणे हद्दीतील एकूण ४ वॉरंट असलेल्या ७ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश….

विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव पोलीस सहायक निरीक्षक अनमोल केदार व टीमची कारवाही…
सोयगाव दि.१२…. सोयगाव पोलीस ठाणे हद्दीतील प्रलंबित असलेले अटक वॉरंटचा पोलीस सहायक निरीक्षक अनमोल केदार यांनी आढावा घेतला असता त्यानुसार वॉरंट बजावनी मोहीम सुरू केली त्यानुसार दि.११ गुरुवार रोजी रात्रीची ग्रस्त असतांना पो.स. निरीक्षक अनमोल केदार यांच्या सह पो.ना.राजू बरडे, पो.शि. रवींद्र तायडे यांनी प्रलंबित वॉरंट घेऊन दिवसा मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रात्रीच्या ग्रस्तीच्या वेळी जळगाव, नाशिक, आणि औरंगाबाद जिल्ह्यात विविध ठिकाणी विविध कलमाखाली गुन्हे दाखल असलेला आरोपी अमोल शांताराम गवळे (३०) यास हळदा तालुका सिल्लोड येथून अटक केली असता सदरील आरोपीवर विविध जिल्ह्यात गुन्हे प्रलंबित असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचप्रमाणे इतर प्रलंबित अटक वॉरंट मधील आरोपींना रात्रीची ग्रस्ती असतांना समाधान चंद्रभान खरात रा.भवानीपुरा,सोयगाव, उल्हास भिकन चोपडे रा.तितुर, रमेश रामा मोरे, बापू रामा मोरे, संजय रामा मोरे ,मिथुन सदा बागुल रा.नांदगाव ता.सोयगाव अशा एकूण सात आरोपींना अटक करून सविस्तर रिपोर्टसह न्यायालयात हजर केले असता यातील एकूण सहा आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सूनवल्याने त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात केली आहे.