धक्कादायक : शिक्षक व विद्यार्थी या नात्याला काळीमा फासणारी घटना, विद्यार्थीनीसोबत केले असे काही.

बरेच पालक शाळेतल्या अभ्यासासोबतच बाहेरचे प्रायव्हेट क्लास देखील आपल्या मुलांना लावत असतात. जेणेकरून त्यांच्या अभ्यासामध्ये आणखी भर पडेल, आणि जास्तीत जास्त मार्क मिळतील. पण एका खाजगी क्लास चालवणाऱ्या शिक्षकांनी नको ते पाऊल उचलले आहे. ज्या विश्वासाने पालक आपल्या मुलांना क्लासला पाठवत असतात तेवढीच जबाबदारी या क्लास वाल्यांची सुद्धा असते पण या बातमीमध्ये थोडसं वेगळी घटना घडली आहे.
समीर नामक शिक्षक हा वाडा येथे चाणक्य कोचिंग क्लासेस च्या नावाने क्लासेस घेतो. याचं स्वतःचं खाजगी कोचिंग क्लासेस आहे, एका तेरा वर्षीय चिमुकल्या विद्यार्थिनींनी प्रवेश घेतलेला होता. मुलीचे वडीलही शिक्षक असल्याने त्यांनी काही दिवसातच या मुलीला खाजगी कोचिंग क्लास सोडण्यास सांगितले. आणि वडिलांनी सांगितल्यामुळे या मुलीनेही ते खाजगी क्लासला जाणं बंद करण्याचा निर्णय घेतला. पण या शिक्षकाने याच गोष्टीचा राग मनात धरून त्या मुलीचं अपहरण केले.
सदरील शिक्षकाने कारमधून या मुलीला एका फार्म हाऊसच्या खोलीत डांबून ठेवले. आपल्या मुलीचे अपहरण झालय हे लक्षात येतात वडिलांनी पालघर पोलिसांना फिर्यादी आणि त्यानंतर पोलिसांनी बारा तासाच्या आत मध्ये या चिमुकल्या मुलीची सुखरूप सुटका करून आरोपीच्या मुस्क्या आवळल्या आहेत. यामधील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून बाकी दोन आरोपी अजूनही सापडले नाहीत पालघर पोलीस त्या आरोपींचा शोध घेत आहेत.
हि घटना पिडीत मुलगी आपल्या घरी येत असताना तिच्या बिल्डिंगच्या आवारातून त्या मुलीचा अपहरण झालं. आपल्या खाजगी कोचिंग क्लास मधून पीडित मुलीला काढल्याचा राग या कोचिंग क्लासच्या शिक्षकाच्या मनात असल्याने या शिक्षकाने त्या मुलीचे अपहरण केले. पण अवघ्या बारा तासाच्या आत आपल्या मुलीची सुखरूप सुटका केल्यामुळे पीडित मुलींच्या कुटुंबाकडून समाधान व्यक्त केला आहे, व त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाचेही आभार मानण्यात आले आहेत.
आपल्याकडे येणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या घरच्यांनी त्या मुलीला खाजगी क्लासमध्ये जाण्यास नकार दिला आणि या कारणाने त्या शिक्षकांनी चक्क एका चिमुकल्या मुलीचे अपहरण केले तर पालघर पोलिसांच्या सतरतेमुळे अवघ्या बारा तासात त्या मुलीचा शोध लागला या प्रकरणी आरोपीच्या मुस्क्या आवडण्यात पालघर पोलीस प्रशासनाला यश आले आहे.