धक्कादायक : दारू दिली नाही म्हणून गावगुंडानी उचलले नको ते पाऊल, पहा बातमी सविस्तर.

एखाद्या गोष्टीचा व्यसन हे माणसाचं आयुष्य बरबाद करू शकत. अगदी शुल्लक कारणावरून मोठे मोठे वाद होतात. आणि कधी कधी याला व्यसन हे कारणीभूत असू शकत. सांगलीतल्या जत तालुक्यातील या ठिकाणी दारू दिली नाही म्हणून अत्यंत चुकीचा प्रकार घडला.
शेड्याळ या ठिकाणी पारधी कुटुंबाच्या घरावर गावगुंडांनी हल्ला करत तोडफोड केली. त्याचबरोबर तीन पारधी भावांना जबर मारहाण देखील केली. गावगुंडांनी पारधी कुटुंबियांचे घर, त्यांच्या गाड्या पेटवून दिल्या या घटनेमध्ये सुरेश चव्हाण, बादल चव्हाण ,आकाश चव्हाण या तिघा भावांना बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये आकाश, बादल हे गंभीर इतर जखमी झाले आहेत. त्यांना सांगलीतल्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं.
मेजर चंद्रकांत गुगवाड, माजी सरपंच अशोक पाटील,सुरेश देवर्षी यांच्यासह दहा जणांना विरोधात जत पोलिसांत गुन्हा दाखल केला. आरोप्यांनी पारधी कुटुंबीयांच्या घरी जाऊन दारूची मागणी केली. त्यानंतर घरामध्ये वडिलांसाठी आणलेली एक दारूची बाटली चव्हाण यांनी दिली मात्र आणखी दारूची मागणी यांच्याकडे करण्यात आली पण दारू नसल्याने त्यांनी देण्यास नकार दिल्यानंतर हा सर्व प्रकार घडला.
दारू दिली नाही म्हणून गावगुंडाने या पारधी कुटुंबियांचं घर पेटवल, त्यांच्या वाहनांचा नुकसान केलं आणि त्यांना देखील या अमानुषपणे मारहाण केली. या मारहाणी नंतर या परिसरात दहशत पसरली. दारू नसल्याने देण्यास नकार दिल्यानंतर हा प्रकार केल्याची फिर्याद जत पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाली आहे.