जरंडी सोसायटीच्या अध्यक्षपदी एकनाथ चौधरी,उपाध्यक्ष प्रकाश पवार बिनविरोध….

विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव,दि.१४….ऐन जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तोंडावर जरंडी सेवासंस्थेच्या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत पॅनेलने बाजी मारली असतांना एकहाती सत्ता मिळविलेल्या या सेवासंस्थेच्या निवडणुकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीतही भाजपाचे एकनाथ चौधरी अध्यक्ष पदी तर प्रकाश पवार उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा अध्यासी अधिकारी संजय गाजूलवाड यांनी सभागृहात केली.

जरंडी सेवासंस्थेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी रविवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अध्यक्ष पदासाठी एकनाथ चौधरी यांचा एकमेव आणि उपाध्यक्ष पदासाठी प्रकाश पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने या दोघांची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा संजय गाजूलवाड यांनी केली निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर मातेरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे कामकाज सुरु करण्यात आले होते.यावेळी सभागृहात शांताराम पाटील,रशीद शेख,यादव पाटील,दामू मुठ्ठे,राजेंद्र पाटील,विठ्ठल माळी,ईश्वर मोरे,दिलीप पाटील,पोपट राठोड,बेबीबाई पाटील,लक्ष्मीबाई गवळे,या सदस्यांची उपस्थिती होती.अनुमोदक सूचक यांनी सुचविलेल्या प्रमाणे अध्यक्ष पदाची माळ एकनाथ चौधरी तर उपाध्यक्ष पदाची माळ प्रकाश पवार यांच्या गळ्यात पडली…सरपंच वंदनाबाई पाटील,उपसरपंच संजय पाटील,भिवा राठोड,मधुकर पाटील,माजी पंचायत सदस्य संजीवन सोनवणे,प्रदीप पाटील; डॉ.अविनाश पाटील,दिनकर राजहंस,श्रीराम पाटील,श्रीराम मुसाळ,अनिल गोरे,कृष्ण रामदास पाटील,कैलास माताडे,शिवाजी किसन,शिवाजी चौधरी,सुशांत पाटील,बाबू पटेल,आदींनी नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे अभिनंदन केले…यावेळी सचिव दिलीप रावणे,अशोक घनघाव,रामचंद्र चौधरी,आदींनी निवड प्रक्रियेचे कामकाज पहिले…