व्हायरल : त्याला पाय नाहीत, पण त्याने अशी दाखवली देशभक्ती ! पहा व्हिडिओ.

भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने अनेक कार्यक्रम योजना राबवत आहे. यानुसार सध्या आपल्या देशामध्ये 75 वा अमृत महोत्सव चालू आहे. त्याचप्रमाणे स्वातंत्र्याचे 75 वर्ष यानुसार बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम सुद्धा घेतले जात आहेत.
या बातमीमध्ये आपल्याला पाहायला मिळते कि, तुमची देशभक्ती ही मनापासून असली पाहिजे त्यासाठी आपण अंगाने परिपूर्ण असलं पाहिजे असं काहीच नाही. देशभक्ती ही देशाप्रती असलेल्या प्रेमाची आदराची भावना आहे या देशभक्तीची भावना स्वातंत्र्य दिनानिमित्त लोक आपापल्या पद्धतीने आदरांजली वाहून पूर्ण करतात.
या बातमीमध्ये सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओ बद्दल आपण बोलणार आहोत. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. सदरील व्हिडिओमध्ये एक दिव्यांग व्यक्ती ज्याला दोन्ही पाय नाहीत, पण ही गोष्ट त्याला देश प्रेम दाखवण्यापासून थांबवू शकली नाही. या व्यक्तीने तिरंग्याचा टी-शर्ट घातलेला आहे आणि हा व्यक्ती खांबावर चढतो आणि स्वतः तिरंगा बनतो.
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्याने स्वतःला तिरंगा बनवून फडकवल्याचे या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळे सगळेजण आश्चर्याने याकडे पाहत असतात. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावरील सर्वजण त्या व्यक्तीला सलाम करत आहेत. त्या व्यक्तीची हिम्मत खरोखरच अप्रतिम असून त्याला दोन्ही पाय नसतानाही त्याने पराक्रम केला आहे. जो कौतुकास्पद आहे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.