धक्कादायक : १५ ऑगस्ट निमित्त आपापल्या आदर्शाचा बॅनर लावण्यावरून हिंदू-मुस्लीम वाद. एकावर चाकूने हल्ला.

आपापल्या आवडत्या नेत्याचा फोटो किंवा बॅनर आपल्या भागात लावायला सर्वांना आवडतो. मग कोणत्याही जातीचा का असेना. असेच एक घटना समोर येत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो असलेला बॅनर लावण्यावरून दोन घटकांमध्ये भांडण झाला आहे. ते भांडण या थराला गेले की एकावर चाकूने हल्ला करण्यात आला.
धार्मिक वादामुळे चर्चेमध्ये असलेल्या कर्नाटकामध्ये हा प्रकार घडला. सदरील घटना घडल्यानंतर या परिसरामध्ये सांप्रदायिक तणाव निर्माण झालेला पाहायला मिळाला. या दोन धर्मातील असणारा वाद वाढण्याचे चिन्ह लक्षात येतात, तेथील प्रशासनाने जमावबंदी लागू केली. हा वाद सावरकरांचे पोस्टर विरुद्ध टिपू सुलतान यांचे पोस्टर यावरून सुरू झाला होता.
अमीर सर्कल याठिकाणी हा सगळा प्रकार घडला. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक राज्यामध्ये सातत्याने धार्मिक तेढ आपल्याला पाहायला मिळतो. हिजाब प्रकरणापासून या वादाला सुरुवात झालेली आहे आणि तसेच दिवसेंदिवस राज्यातील तणाव वाढताना दिसतो.
यामध्ये मिळालेली माहिती अशी की, हिंदुत्ववादी व काही मुस्लिम समुदाय यांनी आपापल्या आदर्शांचे बॅनर लावण्यावरून हा वाद पेटला. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि टिपू सुलतान यांच्या बॅनर वरून या वादाला सुरुवात झाली. हा वाद इतका वाढला की, दोन्ही पक्ष एकमेकांना मारण्यासाठी समोर आले आणि याचाच परिणाम म्हणून एका व्यक्तीवर चाकूने हल्ला केला गेला. त्यानंतर पोलिसांनी जमाव बंदी आदेश लागू केला. चाकू हल्ला झालेला व्यक्ती सध्या हॉस्पिटलमध्ये दाखल असून त्याच्यावर उपचार चालू आहेत.
तिथे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण राहावे म्हणून पोलिसांनी लाठीमार केला. आता त्या ठिकाणी तिरंग्याच बॅनर लावले आहे. ज्या ठिकाणी दोन्ही समुदाय आपापल्या आदर्शांचे बॅनर लावण्यावरून एकमेकाला जिवे मारायला तयार झाले होते.
या वादानंतर काही हिंदुत्ववादी संघटनांनी वीर सावरकर यांचा अपमान केल्याप्रकरणी, समोरील समुदायावर खटला दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.