घरात लहान कोणी मोबाईलवर गेम किंवा अतिवापर करत असेल, तर सावधान गेम खेळताना अचानक मोबाईलचे झाले असे काही.

सध्या डिजिटल च्या डिजिटलच्या काळामध्ये सर्वजण डिजिटल झाले आहेत. कमी किमतीमध्ये चांगल्या कंपनीचा चांगला मोबाईल आपल्याला मिळतो, त्यामुळे लहान असो किंवा मोठे या प्रत्येकाच्या हातात आपल्याला मोबाईल दिसतो. पण या बातमी मध्ये असं काही घडलं आहे की, ज्यावर लवकर विश्वास बसणार नाही. जर आपण मोबाईलचे जास्त प्रमाणात वापर करत असाल किंवा मोबाईलवर गेम खेळत असाल तर आपल्यासाठी ही बातमी नक्कीच महत्त्वाची आहे.
ही घटना राजस्थान मध्ये घडली आहे. साहवा पोलीस स्टेशन परिसरामध्ये एक हृदयातद्रावक घटना घडली, एक खचाखच भरलेलाट्रक होता आणि यात एका व्यक्तीचा मोबाईलचा गेम खेळताना स्फोट झाला आणि यामुळे ट्रकने पेट घेतला त्यामुळे लहान मुलांसह बाकी इतर देखील यामध्ये जखमी झाली. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून गंभीर जळालेल्या भाविकांवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत.
यामध्ये मिळालेली माहिती अशी की, काही भाविक भक्त देवदर्शनासाठी ट्रकने जात होते आणि ट्रकच्या मागच्या बाजूस गाद्या टाकून भाविक बसलेले होते. यात बसलेला 14 वर्षे मुलगा मोबाईलवर गेम खेळत होता आणि गेम खेळत असताना अचानक मोबाईलचा स्फोट होतो. हा जळलेला मोबाईल त्या मुलाच्या हातातून निसटून खाली अंथरलेल्या गादीवर पडतो. आणि त्यानंतर ही गादी पेट घेते. यामध्ये जवळजवळ 40 जण गंभीर भाजले आहेत. वेळीच नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली.
वेळीच नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणली आणि होणारी मोठी दुर्घटना टळली. यानंतर आगीत भाजलेल्यांना सर्व जखमींना दवाखान्यात दाखल केली गेली तिथून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून शासकीय जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. सध्या जखमींवर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
चायना मोबाईल बाजारामध्ये स्वस्त भेटतात त्यामुळे प्रत्येकाच्या हातात आज आपल्याला मोबाईल पाहायला मिळतो. पण हा मोबाईल लहान मुलांसाठी घातक ठरू शकतो. कारण लहान मुलं हे मोबाईलच्या साठी अतिवेडे असतात. त्यामुळे आपल्या घरात देखील कोणी लहान मुलगा गेम किंवा मोबाईल वापरत असेल तर आपण या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे की, त्या मोबाईल पासून त्या मुलाला कोणती इजा होणार नाही.