नगर ब्रेकिंग : आता पुन्हा एकदा ‘या’ कारणाने आ. राम शिंदे हे चर्चेत, पहा काय आहे ते कारण..

अधिवेशनामध्ये विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक होणे अपेक्षित आहे. आणि विधान परिषदेच्या सभापतीपदी भाजपचा उमेदवार बसावा यासाठी आता हालचाली सुरू झालेल्या आहेत.
आपण विधान परिषदेतलं बलाबल बघितलं तर तर सध्या भाजपकडे 24 शिवसेनेकडे 11 राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी १० जागा आहेत. आत्ता लगेचच भाजपला बल जळणार नाही, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा कोठा अद्यापही रिक्त आहे. हा कोटा पूर्ण झाला तर भाजपचा संख्याबळ मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल.
जवळपास ते 36 पर्यंत होईल या पार्श्वभूमीवर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही एकत्र आले तरी भाजपचे संख्याबळ हे त्यांच्यापेक्षा जास्त असेल. त्यामुळे भाजपचाच सभापती होईल यामध्ये शंका नाही. परंतु त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची निवड अधिवेशनापूर्वी म्हणजे सभापती पदाची निवडणूक होण्यापूर्वी व्हावी लागेल आणि भाजपचा प्रयत्न असा आहे की, ती निवड तातडीने व्हावी.
विधान परिषदेच्या सभापती पदासाठी आता भाजपने जोरदार हालचाली सुरू केल्याने भाजपकडून आमदार राम शिंदे यांचे नाव सध्या आघाडीवरती असल्याची माहिती समोर येत आहे.
राम राजे निंबाळकर यांची टर्म संपल्यानंतर या अधिवेशनामध्ये विधान परिषदेच्या सभापती पदासाठी भाजपचे प्राध्यापक राम शिंदे यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे.