बहुलखेडा येथे मोफत तपासणी शिबिर उत्साहात पार पडले.

विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव दि.१७…बहुलखेडा येथे मुतखडा तपासणी व निदान शिबीर व अस्तिरोग, पाठिचेमनके,सांधेदुखी खुडघेदुखी,व हाडाचे सर्व रोग निदान शिबीर संपन्न झाले,
वृंदावन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल पाचोरा,बहुलखेडा ग्रामपंचायतसेच मराठा प्रतिष्ठान चे अध्यक्ष सोपान दादा गव्हांडे पाटील ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच सर्वे सम्माननीय ग्रामपंचायत सदस्य,महिला ग्रा.संघ,आशा सेविका तसेच समस्त ग्रामस्त यांच्या संयुक्त विद्यमाने, मोफत तपासणी शिबिर उत्साहात पार पडले.
वृंदावन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक डॉ.निळकंठ पाटील(अस्तिरोग तज्ञ) तसेच डॉ. प्रशांत महाजन.MBBS.DNB(युरोलॉजिस्ट) मराठा प्रतिष्ठान चेअध्यक्ष सोपान दादा पाटील याच्या माध्यमातून बहुलखेडा गावात,पंचक्रोशीतील नागरीकंची मोठ्या संख्येने तपासणी झाली.
शिबिरासाठी प्र.उपस्थिति संरपंच उपसरपंच,महीला ग्राम संघ ,CRP,आशा सेविका ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते तपासणी झालेल्या पेशंट चे आँपरेशन महात्मा फुले जन आरोग्य योजनेतुन मोफत शस्त्रक्रीया होणार आहे.यासाठी संरपच,उपसरपंच, ग्रा.सदस्य, महिला ग्रा.संघ,ग्रा.कर्मचारी वृंद,आशा सेविका तसेच मराठा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली.