किन्ही येथे समाजसेवक समाधान शिंदे पाटील यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थांचा सत्कार.

विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव : किन्ही येथे 75 वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
तालुक्यातील युवा समाजसेवक तथा स्वप्नपूर्ती फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष समाधान शिंदे पाटील यांनी किन्ही येथे जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा येथील इयत्ता 7वी मध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना 1,151 रुपये रोख रकमेचे पारितोषिक देऊन त्यांचा गौरव केला. तसेच त्यांनी पुढील शैक्षणिक वर्षासाठी सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासातील प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रत्येक विद्यार्थांना प्रथम क्रमांकावर उत्तीर्ण होण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या हेतूने सदरील बशिस वितरण करण्यात असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले,दरवर्षी 15 आँगस्ट निमित्ताने गुणवंत विद्यार्थांचे सत्कार आयोजित करण्यात येते या वर्षी स्वप्नपूर्ती फाउंडेशन च्या वतीने प्रथम बशिस देण्यात आले.
यामध्ये प्रथम क्रमांकावर उत्तीर्ण झालेली विद्यार्थीनी कु.समृद्धी एकनाथ पवार,दृत्तीय वैष्णवी गणेश बलांडे,तृतीय कृष्णा धनराज राऊतराय व प्रज्ञा सुभाष वाडेकर या गुणवंत विद्यार्थांचे बशिस वितरण करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, .याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक अशोक पाटील सर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा गीता ताई झेंडे, सदस्य अर्चना राऊतराय ,कविता जाधव, दिलीप कुंभार , विनोदसिंग परदेशी, रवींद्र पाटील, विकास देशमुख, तात्याराव बिरादार, प्रभाकर पाडवी ,मारुती हंगरगे सर्व शिक्षक वृंद,गावातील विविध पदाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.