येणेगुर येथील गुणवंतांचा सत्कार, लोककल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा उपक्रम..

उमरगा/प्रतिनिधी – विक्रम दासमे
उमरगा तालुक्यातील येणेगुर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त व स्वातंत्र्य सैनिक कै.केशवराव दासमे यांच्या स्मरणार्थ लोककल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने दि.१५ रोजी येणेगुर येथील कॅप्टन जोशी स्मारक विद्यालय येथील बारावी तसेच दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.



याप्रसंगी कु.प्राजक्ता जाधव, श्रद्धा बिराजदार, क्रिश बनसोडे, सानिका टेकाळे, नम्रता कवठे, कु.मुस्कान जमादार, शरणाबाई बिराजदार, पल्लवी गायकवाड, श्रद्धा सोनकटाळे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.



या कार्यक्रमास अशोकराव दासमे,परमहंस संस्थेचे सचिव बी.ए.बिराजदार,लोककल्याण संस्थेचे सचिव रवि दासमे,परमहंस शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देवराज बिराजदार, मुख्याध्यापक महेश हरके, लोककल्याण संस्थेचे अध्यक्ष विक्रम दासमे, महेश कुंभार, प्रमोद जाधव, तुकाराम दळवे, शंकर हुळमजगे, लक्ष्मी लामजने, आनंदराव बिराजदार, सौरभ उटगे, गोपाळ गेडाम, व्यंकट बिराजदार, महेश खंडाळकर, चंद्रकांत बिराजदार, प्रविण स्वामी, महादेव बिराजदार, सुरेश जाधव, गणेश जोजन, अप्पु मुदकण्णा सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी तसेच लोककल्याण संस्थेचे सदस्य उपस्थित होते
