माझं गाव
संजय शहापूरकर यांचा सोयगाव गटविकास अधिकारी प्रकाश नाईक यांच्या हस्ते गौरव.

विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव. स्वातंत्र्य दिनी पंचायत समिती कार्यालयाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते संजय शहापूरकर यांचा गौरव करण्यात आला.
कुपोषण कमी करण्यासाठी गेल्या 20 वर्षा पासून संजय शहापूरकर काम करीत आहे याच कामाची दखल घेऊन गटविकास अधिकारी प्रकाश नाईक यांनी त्यांचा शाल श्रीफल व प्रमाण पत्र देऊन गौरव केला.
या प्रसंगी आयसीड्स. चे अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी यांचे कर्मचारी पंचायत समिती कार्यालय मधील अधिकारी व कर्मचारी पर्यवेक्षिका आशा तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.