कृषी खबर

कृषी वार्ता : शेतकऱ्याने ५ एकर फळबाग नांगरली, त्यामागे आहे हे कारण ! पहा सविस्तर बातमी.

बदलत्या वातावरणाचा परिणाम हा थेट उत्पादनात होत असते. पावसामध्ये सातत्य राहिल्यामुळे पिकांचे नुकसान होत असते त्यामुळे अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आधार होता तो फळबागांचा. याशिवाय पावसामध्येही फळबागा जपण्यावर शेतकऱ्यांचा भर होता, पण आता पावसाने उघड दिली असली तरी वातावरणातील बदलल्यामुळे काही फळझाडांवर रोग पडायला लागले आहेत. ढगाळ आलेले वातावरण असताना कीड रोगही वाढ झाली. उत्पादनापेक्षा बागा जोपासन्यावर अधिकाधिक शेतकऱ्यांचा खर्च होत आहे आणि त्यामुळे एका शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले आहे.

बदलते वातावरणाचा परिणाम हंगामातील पिकांवरच झाला असं नाही तर, फळबागांवरही झाला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये डाळिंब बागांचे क्षेत्र वाढत आहे. पीक पद्धतीमध्ये बदल करून उत्पादनात वाढ करण्याचा प्रयत्न केला तरी निसर्गाच्या लहरीपणासमोर शेतकरी हातात झाला आहे. यामध्ये उत्पादनात होणारी घट आहे ती कशी ती काहीतरी करून भरून काढली जात होती. पण दरवर्षी उत्पादनापेक्षा नुकसान जास्त होत आहे. येवला तालुक्यातील एरंडगाव येथील सतीश ठोंबरे या शेतकऱ्याने पाच एकरातील डाळिंब बाग अक्षरशा नांगरून टाकलं. नुकसान होण्यापेक्षा क्षेत्र रिकामी राहिले तरी चालेल असं ठोंबरे यांचे म्हणणं आलं. आतापर्यंत द्राक्ष उत्पादक हे अडचणीत होते पण आता डाळिंब बागायतदारही त्रस्त झाले आहेत.

सध्या पाऊस जरी कमी झाला असला तरी अजून ढगाळलेले वातावरण कमी झालेले नाही. आणि त्यामुळे फळबागांवर रोगाचे प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये वाढले आहे. पावसात फळबागा जोपासण्यावर शेतकऱ्यांचा भर होता, मात्र आता पावसाने उघड दिली पण वातावरणातील बदलामुळे डाळिंब सारख्या फळावर कीड आणि रोगराइचं प्रादुर्भाव झाला सुरू झाला. त्या बागांना जोपासण्यापेक्षा त्यांच्यावर अधिक पैसे खर्च होत गेले आणि त्यामुळे या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले.

या वातावरणातील बदलामुळे डाळिंब फळबागेवर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. मागच्या वर्षी अवकाळी पावसामुळे फळबागांचे अतोनात नुकसान झाले होते. आणि म्हणून गतवर्षीचे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने रोगराई व नैसर्गिक आपत्तीचा फटका या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांवर बसला आहे. आणि त्यामुळे नुकसान करून घेण्यापेक्षा ती बाग मोडलेली कधीही चांगलं असं या शेतकऱ्याचे म्हणणं आलं.

दीड महिन्यापासून राज्यांमध्ये अतिवृष्टी चालू आहे. खरिपातील पिकांची तर नुकसान झालीच आहे पण फळबागही आडवे आहेत. राज्यात ओला दुष्काळ आहे. कारवाई करण्यासाठी विरोधक आक्रमक आहेत. तरी दुसरीकडे शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं सांगितले जात आहे. घोषणा झाली पण प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर नेमकी कधी रक्कम जमा होणार याबाबत लवकरच सांगितले जाणार असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Back to top button

Share this news instead of copying!