नगर ब्रेकींग: शिर्डीत पकडला दहशतवादी , ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीखाली लावणारा बॉम्ब ?
Nagar breaking: Terrorist caught in Shirdi, bomb placed under the car of 'that' police officer?

शिर्डी म्हटलं की गर्दीच गर्दी, शिर्डी मध्ये मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ असते. दहशत वादी हल्ला करू असे अनेक वेळा संदेश हे प्रसारमाध्यमांवर ती सोशल मीडियावर व्हायरल अशा धमक्या देखील दिल्या जातात, कारण धार्मिक आणि गर्दीचं ठिकाण ही शिर्डी म्हणून ओळखलं जातं मात्र याच शिर्डी मध्ये एक दहशतवादयाला थेट पंजाब पोलिसांनी अटक केली आहे पाहूयात बातमी सविस्तर
दहशतवादी हल्ले म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात आजवर घडलेले सर्वच हल्ले. मात्र पोलिसांच्या गाडीला उडवून देण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी केला होता. पोलिसाच्या गाडीला उडवून देण्याचा हा कट 16 ऑगस्ट रोजी आखण्यात आला होता. आयईडी लावून एका पोलिस उपनिरीक्षकाची गाडी उडवून द्यायची होती, यासाठी हा कट रचण्यात आला होता. मात्र महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक आणि पंजाब दहशतवाद विरोधी पथकाने शिर्डी येथे संयुक्त कारवाई करतात रात्री उशिरा राजेंदर नावाच्या दहशतवाद्याला कंठस्नान घातले.
पंजाब मधील एका पोलिस अधिकाऱ्याच्या गाडीला बॉम्ब लावून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या या आरोपीला गजाआड करण्यात. आल्या 16 ऑगस्टला पंजाब पोलीस उपनिरीक्षक गाडीला आयईडी लावून उडविण्याचा कट आखण्यात आला होता, त्यावर ती पंजाब आणि महाराष्ट्र विरोधी पथकानं संयुक्त कारवाई केली. राजेंदर शिर्डीतील हॉटेल गंगा मध्ये वास्तव्य करत होता आणि या ठिकाणी रात्री पोलिसांनी धाड टाकून आरोपीला ताब्यात घेतल त्याची कसून तपास पंजाब पोलिस करत आहेत.