धक्कादायक : शिक्षकाने वर्गातच केली लघुशंका, व्हिडिओ होत आहे व्हायरल ! पहा बातमी सविस्तर.

अत्यंत लाजिरवाणं असा प्रकार घडला आहे. अमरावतीच्या शिक्षण विभागाला काळीमा फासणारी ही घटना घडली. अनेकदा वर्गांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांकडून चुकीचे काम करून घेतात. कधीकधी त्यांना शिक्षाही करतात असे अनेक प्रकार घडतात. कधी शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांची मसाज करायला लावतात, तसेच त्यांची कामही करायला लावतात, कधी शिक्षक झोपलेली ही पाहिली असतील.
ही बातमी वाचून तुम्हाला संताप येईल. या बाबतीत अत्यंत विचित्र प्रकार घडला. अमरावती जिल्ह्यातील ही बातमी आहे. मेळघाटातील एका शाळेमध्ये हा प्रकार घडला. एका शिक्षकाने विद्यादान करायचं सोडून विद्यार्थ्यांना शाळेला सुट्टी असल्याच सांगितलं असेल, दारू पिऊन खुर्चीवर तो झोपला आहे. आणि दारूच्या नशेत तिथेच त्याला लघुशंका झाली. या प्रकारामुळे एकच खळबळ माजली.
हा जिल्हा परिषद शाळा मधील शिक्षक असून याचे नाव पृथ्वीराज चव्हाण 38 वर्षीय शिक्षकाचा नावे शाळेत हजर विद्यार्थ्यांना शाळेला सुट्टी असल्यास त्यांना सांगितलं, नंतर मस्त दारू पिऊन खुर्चीवर झोपी गेला आणि तिथेच त्याला लघुशंका झाली. हा प्रकार विद्यार्थ्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी पालकांना शाळेत बोलावलं. पालकांनी या शिक्षकांचा समाचार घेतला उलट पालकांवर हा शिक्षक दादागिरी करत होता,
याबाबत व्हिडिओ देखील सोशल मीडिया वरती आलेला आहे. या गावातील दोनशे विद्यार्थी या शाळेतून शिक्षण घेतात. चार शिक्षक या शाळेत कार्यरत आहेत. एक शिक्षिका प्रसूतीसाठी रजेवर ती आहे, त्यामुळे तीन शिक्षक काम करत आहेत. या तीन पैकी एक सहाय्यक शिक्षक पृथ्वीराज चव्हाण हा दारूच्या नशेत त्याठिकाणी शाळेत येतो, झोपा काढतो आणि जागेवर तिथेच लघुशंका करतो.
अमरावती शिक्षण विभाग या गोष्टीकडे कसे पाहतोय, काय कारवाई केली जाणार आहे आणि पुढे काय घडतं हे पाहणं फार महत्त्वाचं ठरेल. मात्र अमरावतीमध्ये असणारे माजी शालेय शिक्षण मंत्री बच्चू कडू याच भागात असा प्रकार घडण उचित नाही. असे शिक्षक समाजाला घातक ठरू शकतात कारण शिक्षकांचं काम हे चांगले विद्यार्थी घडवण आहे, विद्यार्थ्यांना चांगले संस्कार देणे विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लावून हे शिक्षकांचे कामे आहे.