स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने सैनिक सन्मान सोहळा पार.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव दिनानिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने सैनिक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. दहीहंडीच्या कार्यक्रमानिमित्ताने ७५ माजी सैनिक पत्नींना “साडी-चोळी, सन्मानचिन्ह व त्यांच्या हस्ते विशेष आरती” घेऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), कर्नल संभाजी पाटिल साहेब यांच्या पत्नी सौ. संध्याताई संभाजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष दिपक गणपतराव शिर्के, राष्ट्रवादी काँग्रेस सैनिक सेलचे प्रदेश सरचिटणीस बाबासाहेब जाधव, राष्ट्रवादी सैनिक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष पोपटराव पडवळ, राष्ट्रवादी सैनिक सेलचे पश्चिम महाराष्ट्र संघटक वसंत अजमाने, प्रदेश संघटक शेषराव काळवाघे, पुणे शहराध्यक्ष अविनाश ढोले पाटील, पुणे जिल्हाध्यक्ष राजाराम धुमाळ, खेड तालुका अध्यक्ष अमित मोहिते उपस्थित होते

त्याच बरोबर लोहगाव विभाग अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, चंद्रकांत ढेंबरे, कॅप्टन बाबुराव पोळके, हडपसर परिसर सुभेदार शहाजी जाधव, संपर्क प्रमुख हडपसर एस एम रोहिदास दशरथे पाटील, प्रकाश जाधव उंड्री माजी सैनिक सेल अध्यक्ष, पुरंदर हवेल तालुका अध्यक्ष संजय काकडे जय जवान सोसायटीचे सदस्य सुभेदार बाबू एडके जय जवान सोसायटीच खजिनदार शिवाजी कांगणकर, जवान सोसायटीचे सदस्य श्री नानासाहेब थोरात, सीनियर सल्लागार सुभेदार मेजर दिगंबर कदम कॅप्टन हनुमंत गरड वाकड सुभेदार मेजर ज्ञानदेव मगर चंद्रकांत शिंदे सुभेदार भूषण भाऊचीकर, सुभेदार हनुमंत गायकवाड पैलवान ..आदी माजी सैनिक पदाधिकारी उपस्थित होते.