धक्कादायक : पुण्यात एका सफाई कर्मचाऱ्यासोबत घडले असे काही जयवर विश्वास बसणार नाही पहा सविस्तर.

”पुणे तिथे काय उणे… म्हंटल जात मात्र त्याच पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. तरुणाचा चोऱ्या, मारा माऱ्या, खून याकडे कल वाढला आहे. गोळीबार चाकू हल्ले तर रोजच होत आहेत.
खराडी भागात असाच एक प्रकार घडला आहे. कचरावेचक असणाऱ्या तरुणाचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. एकनाथ पठारे वस्ती मध्ये सव्वा सहाच्या सुमारास दुचाकीवरून कामाला जाणाऱ्या कचरावेचक तरुणावरती दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पाठीमागून तीन गोळ्या झाडल्या, यात अक्षय भिसे यांचा मृत्यू झाला. गोळीबारानंतर हे हल्लेखोर फरार झाले.
चंदन नगर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांनी याबद्दलची माहिती दिली. या दैनंदिन जीवनामध्ये अक्षय सकाळी आपलं काम करण्यासाठी घराबाहेर पडला. कचरावेचक म्हणून काम करतो म्हणून तो येरवडा येथील डम्पिंग स्टेशनला नेहमी प्रमाणे निघाला होता.
सकाळी सहा वाजले होते घरातून निघला. तर 200 मीटर अंतरावर ती पाठीमागून दुचाकीवर ते दोन तरुणांनी अक्षय यांच्यावर ती गोळी झाडली, आजूबाजूच्या लोकांनी अक्षयच्या पत्नीला आणि इतर मित्रमंडळींना सांगितलं. ते घटनास्थळी आले. अक्षयला रिक्षा घेऊन खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. सध्या चंदन नगर पोलिस तपास करत आहेत.