धक्कादायक : मजुरांना घरी बोलवून घेतले आणि त्यानंतर त्यांना अशा प्रकारे नीच वागणूक दिली पहा सविस्तर.

महाराष्ट्राला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सदरील घटना सोलापूर मध्ये घडलेली आहे दोन मजुरांना कामाचे पैसे घेण्यासाठी येण्याचा निरोप पाठवला. आपण केलेल्या कामाचे पैसे मिळणार याचा आनंद मजुरांच्या चेहऱ्यावर दिसत होता. पण हा आनंद क्षणापुरताच असेल असं त्यांना वाटलं नव्हतं. घरी आलेल्या मजुरांना जबरदस्तीने बसवण्यात आलं. या दोघांचे हातपाय बांधण्यात आले आणि त्यांना अतिशय वाईट वागणूक देण्यात आली.
ही धक्कादाय घटना माढा तालुक्यातील भुताष्टे गावात घडले आहे. पांढऱ्या दोरीने पाठीवर तसेच हाताने अमानुषपणे मारहाण केल्याचं या व्हिडिओमध्ये समोर आला आहे. एवढं करूनच तो आरोपी थांबला नाही तर त्याने शिवीगाळ दमदाटी सुद्धा केली. दोन मजुरांना या आरोप्याने गायब केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याप्रकरणी माढा पोलीस स्टेशनमध्ये चार जणांविरोधात ॲट्रॉसिटी, मारहाण, अपहरण सारखे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पैसे घेण्यासाठी बोलवून मजुरांना बेदमपणे मारहाण केली ही घटना सोलापूर मधील माढा तालुक्यात घडलेली आहे. घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये मजुरांना मारहाण होताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बऱ्याच वेळाने आरोपींवर कारवाई करण्यात आली आणि या घटनेमुळे संताप देखील व्यक्त केला जात आहे.
भुताष्टे गावातील लाईट पोलचे मुकादम बालाजी मोरे यांच्याकडे दोन मजूर मागील दोन महिन्यांपासून कामाला होते. कामाचे पैसे घ्यायला ये असं सांगून या दोघांना आरोपी बालाजी मोरे, भालचंद्र यादव यांच्यासोबत आणखी चार जणांनी मारहाण केली आहे. या प्रकरणाचा तपास म्हाडा पोलीस करत आहेत.