माजी मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचा वाद पुन्हा एकदा चहाट्यावरती येण्याची दाट शक्यता आहे.

करुणा शर्मा यांनी विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. त्यामूळे राज्यातील सत्तांतरानंतर धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.यावेळी करुणा शर्मा यांनी अनेक गंभीर आरोप केले. मला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे, असे त्यांनी म्हटले. करुणा शर्मा यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. करुणा शर्मा यांच्यावर आत्महत्येसाठी कोण दबाव आणत आहे, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
विधानसभेत सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाच्या बाकावर मा. मंत्री धनंजय मुंडे हे बसलेले आहेत. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करतात .त्यामुळेच ते आता डोळ्यावरती येत आहेत. त्यामुळे विधानसभेत मुख्यमंत्री यांनी बोलतान ,अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील संबंधांचा मुद्दा उपस्थित केला होता. ‘धनंजय मुंडे एवढ्या जोरात घोषणाबाजी करत होते, की ते किती वर्षांचे शिवसैनिक आहेत, असं वाटत होतं. बेंबीच्या देठापासून ओरडून, तुमचा घसा खराब होईपर्यंत तुम्ही बोललात, आता तुमचा पण सगळा प्रवास मला माहिती आहे, त्यावेळी देखील आपल्या देवेंद्रजींनी थोडं प्रेम, दया, करुणा दाखवली, दाखवली ना? त्यामुळे थोडं…’, असे एकनाथ शिंदे यांनी म्हणताच सत्ताधाऱ्यांच्या गोटात हशा पिकला होता. साहजिकच या सगळ्यावर धनंजय मुंडे यांना शांत राहावे लागले होते.
मात्र आज या सगळ्या वरती विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली .अजित पवार म्हणत म्हणाले ”विधानसभेला एक संस्कृती आहे, वडीलधाऱ्यांनी येथे काही परंपरा ठेवेल्या आहेत.विधानसभेचा एक दर्जा देखील येत आहे.
आरोप- प्रत्यारोप होत असतात आम्ही आमची भूमिका मांडतो. सत्ताधारी पक्ष त्यांची भूमिका मांडतात .फक्त माझं मत असा आहे की वैयक्तिक निंदा नालस्ती कुणाचीही कोणी करू नये, इथे इतर राज्यांसारखे वेडेवाकडे प्रकार सभागृहात झालेले मला पाहायला मिळतात. पुढच्या खुर्च्या उचलने , मारामारी करणे अशा प्रकारच्या घटना आपल्याकडे होऊ देत नाहीत कारण सुरुवातीपासून वडीलधाऱ्यापासून चालत आलेली परंपरा पुढेही तसेच चालू ठेवायची आम्ही सभागृहात जागृत राहून काम करत असतो. काहीजण बोलता बोलता तोंडाला येईल ते बोलतात. प्रत्येकाने बोलताना एक मर्यादा ठेवायला हवी आपल्याकडून काही चूक होऊ देता कामा नये असे म्हणत अजितदादांनी यांनी चांगला समाचार घेतला.