धक्कादायक : खाजगी कर्जाला कंटाळून दांपत्याने उचलले टोकाचे पाऊल, पहा बातमी सविस्तर.

खाजगी लोकांचे कर्ज फेडण्यासाठी म्हणून एका दाम्पत्यांना चुकीचे पाऊल उचलला आहे. कर्ज फेडायचे म्हणून चार एकर पैकी दीड एकर जमीन विकली यावरून नवरा-बायको यांच्यामध्ये रोजच भांडण व्हायचं. या सततच्या होणाऱ्या भांडणाला कंटाळून एका दाम्पत्यांना आत्महत्या केली आहे. खाजगी कर्ज फेडण्यासाठी जमीन विकली होती त्यावरून वाद व्हायचा याच उद्रेकातून दोघांनी टोकाचे पाऊल उचललं आहे ही घटना कळम तालुक्यातील नायगाव मध्ये घडली आहे.
दीक्षित कुटुंबांमधील पती आणि पत्नीने रविवारी राहत्या घरी साडी ने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. दरम्यान पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
आत्महत्या करणाऱ्या या दोघांची नावे प्रकाश वसंत दीक्षित व अश्विनी प्रकाश दीक्षित अशी आहेत. त्यांच्या पश्चात आई एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे या प्रकरणात सोमवारी दुपारपर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.
लोकांकडून घेतलेले खाजगी कर्ज फेडण्यासाठी शेती विकली आणि त्यामुळे या दोघांमध्ये रोजच भांडण व्हायचे असं प्रकाश ची आई रतन दीक्षित यांनी सांगितलं. दीक्षित कुटुंब आठ दिवसापूर्वीच पुण्याहून नायगावला राहायला आले होते अशी माहिती मिळाली आहे.