धक्कादायक घटना; ‘या’ जिल्ह्यात, दोन मुली झाल्या म्हणून पतीचा पत्नीवर कोयत्याने हल्ला!
In 'Ya' district, husband attacks wife with koya for having two daughters!

मुलगी म्हणजे आपल्या घरातली लक्ष्मी असते ,मात्र कधी कधी याच मुलीला परक्याचं धनही म्हटलं जातं. मुलगी किती सांभाळली तरी लोकांच्या घरी जाणार म्हणून तिची अवहेलना हि केली जाते . काही कुटुंबांमध्ये मुलगी जन्माला आल्यानंतर तिला नकोशी म्हंटल जात.लागोपाठ दोन मुली झाल्यामुळे एका कुटुंबामध्ये अत्यंत धकादायक प्रकार घडला, मुलींना जन्म देणाऱ्या त्या आईला जर मरण यातना सहन कराव्या लागल्या .
यवतमाळ जिल्ह्यामधील पार्डी बंगला इथं एक धक्कादायक घटना घडली घडली. लागोपाठ दोन मुली झाल्याच्या कारणातून पती शिवाजी चव्हाण नेहमीच पत्नी जयश्रीसोबत वाद घालत, तिला मारहाण करायचा. दरम्यान अशाच वादातून त्याने तिला सुरुवातीला नायलॉन दोरीने गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याला पत्नीने विरोध केला असता चिडून पतीने पत्नीवर लोखंडी कोयत्याने डोक्यावर, मानेवर वार केले. या घटनेनंतर आरोपीने पोफाळी पोलीस स्टेशन गाठून हे कृत्य केल्याची कबुली दिली दिली.पत्नीच्या मानेला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली असून पत्नी या हल्ल्यामध्ये रक्तबंबाळ झाली होती.ही धक्कादायक घटना उघडकीस येण्याआधी पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते. नेहमीचे वाद, त्यानंतर लागोपाठ झालेल्या दोन्ही मुलीच याचा राग मनात धरुन पतीने पत्नीला संपवण्यासाठी हे संतापजनक कृत्य केलं.
जयश्री शिवाजी चव्हाण अस गंभीर जखमी पत्नीचे नाव असून शिवाजी अवधुत चव्हाण (वय 38, राहणार पार्डी बंगला) असे आरोपी पतीचे नाव आहे. शिवाजी चव्हाण याने कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची माहिती दिल्यावरुन ठाणेदार राजीव हाके, प्रकाश बोंबले यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. जखमीला जयश्रीचे नातेवाईक तिला उपचारसाठी नांदेड येथे घेऊन गेले होते. घटनास्थळावर रक्ताचा सडा पोलिसांनी पाहिला. बाजूलाच रक्ताने माखलेला लोखंडी कोयता व नायलॅान दोरी पडून होती. ते सर्व साहीत्य जप्त करण्यात आले.
इथे मुलगी जन्माला आली, तरी दुसऱ्या एका स्त्रीला मारलं जातं. तिथे मुलींनी जन्म घेतला तरी तिला बलात्कार करून कोणीतरी मारतं. इथे मुलीचे लग्न केल्यानंतरही तिला सासरची मंडळी मारतात आणि आपण म्हणतो की इथे मुली सुरक्षित आहेत किंवा मुलींना सुरक्षा पुरवली जाते वास्तवात मात्र असं काहीही घडत नाही