माणुसकीला काळीमा फासणारी घटना – आई वडिलांच्या या आजारामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळेने नाकारला मुलाचा प्रवेश !

इंग्रजी शाळांमध्ये आपल्या मुलांना शिकवण्याचं एक नवीन ट्रेंड आलेला आहे. इंग्रजी शाळेत मुलगा शिकला, आपली मुलगी शिकली की म्हणजेच उच्चशिक्षित झाली किंवा आपण त्याला दर्जेदार शिक्षण दिलं असं म्हटलं जातं. सध्या मराठी शाळांमध्ये देखील इंग्रजी माध्यमात चालवले जात आहेत. अगदी पहिलीपासून सेमी इंग्रजी हा प्रकार देखील आता मराठी शाळांमध्ये आला आहे. तर बऱ्याच शाळा या धूळ खात पडलेल्या आहेत. कारण आपली मुलं ही इंग्रजी शाळेत शिकवायची असा हा पालकांचा आग्रह असतो आणि यातूनच असे विचित्र प्रकार घडतात. इंग्रजी शाळा त्यामुळेच पालकांसोबत अशा पद्धतीने वागतात.
ही बातमी एका इंग्रजी शाळेत बद्दलची आहे एका इंग्रजी शाळेनं आई-वडील हेच HIV बाधित आहेत म्हणून त्या मुलांचा प्रवेश नाकारला. आपल्या आई-वडिलांना एखादा आजार आहे म्हणून या मुलांचं आयुष्य काळोखातच या इंग्रजी शाळेने लोटले. सदरची घटना बीड जिल्ह्यातील पाली या ठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडला. या इंग्रजी शाळेचे नाव परिवर्तन आहे मात्र या शाळेच्या विचारांमध्ये या शाळेला चालवणाऱ्या लोकांच्या विचारात परिवर्तनाचे कुठलेही विचार नाहीयेत.
कारण मुलं हे इंग्रजी शाळेत शिकावेत म्हणून आई-वडील प्रयत्न करत आहेत. मात्र परिवर्तन इंग्लिश स्कूल या मुलांचा प्रवेश नाकारला आहे. कारण ज्या माता-पित्यांना आजार आहे आणि त्यामुळेच अशा पद्धतीने हिंसक वागणूक या शाळेनं या मुलांना दिल्या. बीड जिल्ह्यातील पाली या ठिकाणी हा धक्कादायक प्रकार समोर येतोय. हि घटना आई-वडील यांच्या आजारावर आधारित असल्यामुळे या मुलांच्या वाट्याला वनवास आला.
इंग्रजी शाळेत आपला मुलगा शिकावा यासाठी आई-वडील दोघेही प्रयत्न करत होते मात्र या मुलाला दीड महिना शाळेत शिकवला. मात्र अचानक तुमच्या मुलाला शाळेत पाठवू नका असं शाळेतून सांगण्यात आलं. असा आरोप पीडित आईने केल आहेत. विशेष म्हणजे 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव झाला आणि आपल्या मुलाला पाठवता आलं नाही. अशी खंत देखील व्यक्त केली. एकीकडे आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आणि त्याच देशात HIV बाधित असणाऱ्या माता-पित्यांना अशी हीन वागणूक दिली जाते.
त्यांच्या आजारपणामुळे त्यांच्या मुलाला शिक्षणापासून दूर लोटलं. शाळेने याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटलं परिवर्तन प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल शाळा संचालक आणि शिक्षकांनी याबद्दल स्पष्टीकरण देताना सांगितलं की, आम्ही कुठलीही या मुलाला हीन वागणूक दिली नाही आमच्याकडे त्याचे फोटो आहेत. मात्र इतर पालक आक्रमक झाले तो मुलगा शाळेत येणार असेल तर आमची मुलं पाठवणार नाहीत असा पवित्रा घेतला. म्हणून आम्ही त्या मुलाचा प्रवेश नाकारला असे या शाळेने म्हटलं.
समाजात यांना हीन वागणूक देणं हे प्रकार घडत आहेत. यात नेमके सत्य काय आहे याचा पडताळा केला जाईलच मात्र समाजाने अशा पद्धतीने वागणं किंवा एखाद्या शाळेने या पद्धतीने वागणं हे अत्यंत चुकीचा आहे. कारण आपण सध्या प्रगतशील महाराष्ट्रात राहतो पुरोगामी विचारांना धरून वावरतो त्यामुळे सर्व शिकले पाहिजेत, सर्वांनी शिक्षण घेतलं पाहिजे हे धोरण सरकार देखील अवलंबत मात्र शिकताना जर अशा पद्धतीने बाधा येत असतील तर यावरती काही तरी ठोस कारवाई होणे देखील तितकाच महत्त्वाचा आहे.