औरंगाबाद मध्ये मुली सुरक्षित नाहीत ? मुलींच्या वसतिगृहात जाऊन टुकार मुलांनी घातला गोंधळ.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मोपेड दुचाकीवरून तीन तरुणी आल्या होत्या. आरोपीनी त्यांचा पाठलाग केला व गोगाबाबा टेकडी परिसरात असलेल्या अंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाजवळ या तरुणींची छेड काढली. या येथून पोलीस कर्मचारी सचिन मस्के हे जात असल्याचं पाहून भेदरलेल्या तरूणींनी म्हस्के यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यामुळे या विकृत तरुणांनी या पोलीस कर्मचाऱ्याच्या देखील डोक्यात दगड घालून पसार झाले.
या प्रकरणानं औरंगाबाद मध्ये एकच खळबळ उडाली आहे कारण काही महिन्यांपूर्वी याच औरंगाबाद मध्ये क्लास वरून घरी जात असताना, एकतर्फी प्रेमातून एका युवकान एका तरूणीवरती धारदार शस्त्राने वार केले होते. त्यानंतर अशाच पद्धतीने या मुलीची छेड काढण्यात आली. आणि त्यांना मदत करणाऱ्या पोलीसावरती हल्ला करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीचा शोध घेत दोघांच्या मुसक्या आवळल्यात तर एक जण यामध्ये फरार आहे.
संदीप चव्हाण, विकी रिडलोन या दोघांना अटक करण्यात आलीय. तर हरीश चौधरी हा तिसरा आरोपी फरार आहे. दरम्यान या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करण्याचे काम पोलिस करत आहेत. या दुचाकीवरुन जात असल्याचे समोर आले आहे. मात्र ते स्पष्ट दिसत नव्हते पोलिसांनी ते अंधूक फोटो डेव्हलप करीत आरोपींचा शोध घेतला. त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली असून एका आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
पोलीस कर्मचारी सचिन मस्के यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत. या तरुणांची एवढी मजल गेली की, या तीन मुलींची छेड काढत असताना त्यांना मदत करण्यासाठी त्या ठिकाणी असणारे पोलीस कर्मचारी यांच्यावर देखील त्यांनी दगड हल्ला केला. या सगळ्या घटनांचा तीव्र निषेध केला जातोय मात्र यातला तिसरा फरार असणारा आरोपी लवकरात लवकर गजाआड व्हावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.