वीस दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जरंडी सह परिसरात पाऊस झाल्याने पिकांना मिळाले जीवदान…..!!

शेतकऱ्यांमध्ये दिलासादायक वातावरण.
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव दि ३०……… पावसाने वीस दिवसांचा खंड दिल्यानंतर मंगळवारी जरंडी व परिसरात दिलासादायक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले होते जरंडी व परिसरात खरिपाचे जुलै कपाशीसह इतर पिके जोमात होते मात्र अगस्ट महिण्यात तब्बल पावसाचा वीस दिवसांचा खंड पडल्याने पिकांची पावसाअभावी वाढ खुंटली होती तसेच रोगराईचा प्रादुर्भाव वाढत होता.
पिके उन्हामुळे शेतकऱ्याच्या हातून जाण्याच्या मार्गावर होती ,यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण होते मात्र मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये दिलासादायक वातारावर निर्माण झाले होते तसेच शेतीपिकांचे पावसाअभावी थांबलेल्या पुढील कामाच्या मशागतीस शेतकरी पुन्हा जोमात सुरुवात करणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे