ती कामावर जाण्यासाठी निघाली मात्र वाटेत तिच्यासोबत घडलं अत्यंत भयानक…; पहा बातमी सविस्तर.

बेशिस्त वाहन चालकांमुळे मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढलं आहे. ही बातमी कल्याण पश्चिमेकडून हाती येत आहे. शहाड रेल्वे उड्डाणपुलावरती हा धक्कादायक प्रकार घडला. कविता म्हात्रे या एका पेट्रोल पंपावरती कामाला होत्या. त्या आपल्या कामाला निघाल्या होता मात्र त्यांच्यासोबत अत्यंत दुःखद असा प्रकार घडला.
कविता म्हात्रे या कल्याण पूर्व परिसरातील टाटा नाका परिसरातील एका पेट्रोल पंपावर कामाला जात होत्या. त्या घरातून दुचाकी वरून कामाला निघाल्या होत्या, मात्र मागून येत असलेल्या टँकरने कविता यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्या टँकरच्या मागच्या चाकाखाली चिरडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेने परिसरामध्ये खळबळ माजली. आपला रोजच्या जीवनामध्ये त्या याच रस्त्याने आपल्या कामाला जात होत्या मात्र आज त्या कामाला निघाल्या आणि पुन्हा परतल्याच नाही. त्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली.
या घटनेची माहिती मिळताच कल्याण महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी धाव घेतली, त्यानंतर महिलेचा मृतदेह शव विच्छेदनासाठी महापालिकेच्या रुक्मिणी बाई रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलीस घटनेचा तपास करत आहेत. तपासांती पोलिसांना त्या टँकरचा जो चालक आहे याची माहिती मिळाली आहे, त्यावरती ठोस अशी कारवाई केली जाईल. पण यामध्ये काहीही चूक नसताना कविता म्हात्रे यांचा जीव गेला. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांचे कुटुंब शोकाकुल आहे.