” आम्ही खरे राज ठाकरे तेव्हाच पाहिले, मात्र आता त्यांच्यात……” मा. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात.

मनसे आणि शिंदे गटात युती होणार असल्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगू लागली आहे. कारण गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या गणपतीचे दर्शन घेतलं. काही चर्चा देखील झाली होती याच चर्चा दरम्यान युतीची चर्चा झाली असावी असे अनेकांचे म्हणणे होते, त्यामुळे सगळीकडे मनसे आणि शिंदे गट यांच्या युती वरती अनेक प्रतिक्रिया येत आहे.
यामध्ये आता माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उडी घेतली, राज ठाकरे यांच्या वर खोचक टीका करायला ते मागे सरले नाही ते म्हणाले की, ” आम्ही खरे राज ठाकरे तेव्हाच पाहिले. युती होईल ही, मात्र राज ठाकरे यांच्यात आता पूर्वीप्रमाणे लढाऊ बाणा राहिला नाही.” अशी टीका थोरात यांनी केली. आता बाळासाहेब थोरात यांच्यासाठी या टीकेला मनसे कसं प्रत्युत्तर देते हे पाहणं फार महत्त्वाचं ठरेल.
मुंबई महापालिकेसह राजाच्या मुख्य महापालिकेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यात आहेत. निवडणुकांमध्ये मनसे, शिंदे या गटांमध्ये युती होणार असल्याचे जोरदार चर्चा सुरू असतानाच, सध्या अनुकूल अशा घडामोडी घडत आहेत. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन गणपती बाप्पांचे दर्शन घेतलं, याच भेटीदरम्यान युती होणार असल्याचा अंदाज राजकीय वर्तुळामध्ये बांधला जात आहे, त्यामुळेच सर्व स्तरातून प्रतिक्रिया सध्या उमटत आहेत.
माञ यात थोरात यांनी केलेले विधान मन सैनिकांच्या जिव्हारी लागत की काय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.