कामाच्या गोष्टी

CNG बाबत चिंता वाढवणारी बातमी आली समोर, CNG गाड्या थांबण्याची शक्यता पहा बातमी सविस्तर.

पेट्रोल आणि डीजेल च्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य जनता CNG कडे वळली पण काही दिवसांपासून CNG चे रेट सुद्धा वाढत गेल्या आणि त्यामुळे पुन्हा सर्वसामान्य पुढे प्रश्न निर्माण झाला. चारचाकी पळवण्यासाठीचा सीएनजी आणि मोठ्या शहरात घरपोच मिळणारा पीएनजी गॅसच्या किंमती पुन्हा एकदा भडकण्याची चिन्हं आहेत. नैसर्गिक गॅसच्या किंमती वाढवण्याशिवाय सरकारपुढे दुसरा पर्याय उरलेला नसल्याने दरवाढ अटळ मानण्यात येत आहे.

केंद्र सरकारला सध्या नैसर्गिक गॅस आयात करण्यासाठी मोठा खर्च सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा गॅस महाग मिळत आहे. त्यामुळे सरकार येणाऱ्या काही दिवसात सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती महाग करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. रशियाची कंपनी गाजप्रोम आणि भारत यांच्यात नैसर्गिक गॅस पुरवठ्याबाबत 20 वर्षांचा करार करण्यात आलेला आहे. हा करार 2018 मध्ये करण्यात आला. तेव्हापासून तो सुरु होता. पण रशिया-युक्रेन युद्धाचा भडका उडाला. त्यात कंपनीने पुरवठा थांबविला आहे.

आणि रशियाने पुरवठा थांबवल्यामुळे त्याचा परिणाम भारतावर होत आहे. भारताला दुसऱ्या देशाकडून वाढीव दराने नैसर्गिक गॅस खरेदी करावा लागत आहे. आता हा बोजा सरकारला सहन करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे किंमती भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरात नैसर्गिक वायुच्या किंमतीत वाढ झाली आहे. युरोपियन देशांनाही त्याची झळ सहन करावी लागत आहे. सध्या परिस्थिती अशी आहे की सीएनजी आणि पीएनजीचा पुरवठा सुरळीत होण्याची चिन्हं नाहीत.

रशिया-युक्रेन युद्धाचा मोठा परिणाम भारतावर झाला आहे. भारत व इतर अनेक देशांना मोठ्या दराने गॅस खरेदी करावा लागत आहे. त्यात पुरवठाही नियमीत होत नसल्याने जगापुढे नवे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे चारचाकी थांबतील आणि स्वयंपाक घरात जेवण तयार करणेही अवघड होईल अशी अवस्था आहे. भारतात किरकोळ महागाई दर 7 टक्क्यांवर पोहचला आहे. त्यात गॅसच्या वाढलेल्या किंमतीचाही प्रभाव आहे. गेल इंडियाला त्याचा फटका बसला आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या नैसर्गिक गॅससाठी कंपनीला 40 डॉलर प्रति मिलियन ब्रिटिश थर्मल युनिट दर मोजावा लागला. हा जगातील सर्वात महागडा करार ठरला आहे.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Back to top button

Share this news instead of copying!