भामटे मित्र ? 4 मित्र पोहोयला गेले अन् त्यातील ‘ एक ‘ बुडाला तर त्याच्या मोबाईल सोबत पहा त्यांनी काय केले.

दोन दिवसांमधली मैत्री ही जय वीरुची मैत्री असते असं म्हटलं जातं. असं म्हणतात की, संकट काळी मित्रच हा आपल्या कामी येत असतो. त्यामुळे अनेक जण आपला मित्राशी अत्यंत सलगिनी वागतात. प्रत्येकाचा एक मित्रांचा समूह असतो. प्रत्येक वयात प्रत्येकाला एक ना एक असे मित्र असतात. या मित्रांचेही अनेक प्रकार असतात. कधीही मित्र गरजूला उभे राहतात तर कधी काही मित्र धोका देखील देतात.
अनेक मित्र हे ग्रुप करून कुठे फिरायला जाणं, पार्टी करणे यात देखील फार रममाण असतात. मात्र या गोष्टी करताना काही चुकीच्या गोष्टी देखील करतात. अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली चार मित्र एका ठिकाणी गेले त्या ठिकाणी एक मित्र बुडायला लागला, मात्र त्या मित्राला वाचवण्याचे सोडून या लोकांनी त्याच्यासोबत अत्यंत चुकीचे केला. आपला मित्र कुठे गेला याला शोधण्याचे सोडून त्या मित्रांचा मोबाईल घेऊन हे तीनही मित्र फरार झाले पाहूया बातमी सविस्तर,
भिवंडी शहरात एक धक्कादायक घटना घडली. शहरातील बीएनएन कॉलेजमधील विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे, पण त्याच्या मृत्यू आधीचा व्हिडीओ सध्या समोर आला असून मित्रांनी त्यांचा मोबाईल चोरल्याचे यात दिसून आले आहे. त्यामुळे नदीत बुडून मृत्यू झाला की घातपात याचा पोलीस तपास करत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित गुप्ता असं बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
भिवंडी शहरातील बीएनएन कॉलेजमध्ये 12 वीत शिकणारे चार विद्यार्थी अजंठा कंपाऊंड येथील विहिरीमध्ये पोहाण्यासाठी गेले. पोहत असताना अमित गुप्ता हा विद्यार्थी वरती आलाच नाही. त्यामुळे त्या विद्यार्थांनी कोणालाही न सांगता घरी निघून गेले. मात्र अमित हा घरी आलाच नसल्याने याच्या कुटुंबीयांनी शोध घेतला मात्र तो मिळाला नाही. त्यामुळे गुप्ता कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि त्यांचा मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांना तपास केला असता 24 तासाने तो अजंठा कंपाउंड येथील विहिरीत पोहण्यासाठी गेला असताना तो बुडाला असल्याचे समजले.
मिळालेल्या माहितीनुसार, अमितच्या मित्रांनी पोलिसांना सांगितले की, आम्ही एक तास पोहत होतो मात्र पोलिसांनी संशय आल्याने विहिरी जवळील सीसीटीव्ही तपासून पहिले असता त्यामध्ये चौघे विद्यार्थी भिंतीवरून उडी मारून पळून जातात आणि पुन्हा काही वेळाने येतात त्यानंतर त्यातला एक विद्यार्थी पुन्हा जातो अमितचा मोबाईल चोरून घेतो. त्यामुळे अमितच्या मृत्यूला वेगळे वळण आले असून त्याचे आजोबा उमा शंकर गुप्ता यांनी सखोल तपास करण्याची मागणी पोलिसांकडे केली असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे तपास करीत आहे.