शहरात मुलं चोरणारी महिला समजून निराधार महिलेलाच केली मारहाण, पहा बातमी सविस्तर.

बऱ्याच दिवसापासून सोशल मीडियावर सध्या मुलं पळवणारी टोळी शहरांमध्ये फिरत असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत आणि यामुळेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेला आहे. त्यामध्ये विशेष बाब म्हणजे काही ठिकाणी तर मुलं पळवणाऱ्या टोळीच्या संशयातून निष्पाप आणि निर्दोष अशा नागरिकांवर गावकऱ्यांकडून हल्ला झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये चाळीसगाव या ठिकाणी देखील अशीच घटना समोर आली आहे. मुलं पळवणारी संशयित एक निष्पाप महिलेला चाळीसगाव मध्ये काही नागरिकांनी मारहाण केली आहे. तसेच पीडित महिलेला मारहाण करतानाचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत. हे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहेत.
मुलं चोरणारी महिला असं समजून चक्क एका निष्पाप महिलेला नागरिकांनी चोप दिला आहे. जळगावच्या चाळीसगाव मध्ये ही सदरची घटना घडलेली आहे. या महिलेने तोंडाला रुमाल बांधलेला असल्याने नागरिकांनी त्या महिलेवर मुलं चोरत असल्याचा संशय घेतला. पण त्या महिलेचा चेहरा हा जळालेला होता आणि म्हणून तिने तोंडाला रुमाल बांधलेला होता अशी माहिती पोलिसांकडून मिळाली. नागरिकांनी घटनेची खातरजमा न करताच कायदा हातात घेत या महिलेला मारहाण केलेली आहे.
या गावातील नागरिकांनी त्या महिलेचा एक शब्दही ऐकून न घेता जोड्याने आणि चपलांनी मारहाण केली. ज्यावेळी पोलिसांनी त्या महिलेची चौकशी केली व या महिलेला जळगाव आशा केंद्रामध्ये दाखल केली. गेल्या काही दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुले चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. असा मेसेज सोशल मीडियावर सगळीकडे वायरल होत आहे. शहरातील पोलिसांकडून अशा असणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात आला आहे. जर कुठे संशयित व्यक्ती आढळली तर नागरिकांनी कायदा हातात न घेता थेट पोलिसांना संपर्क करावं असं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
यामध्ये मिळालेली माहिती अशी की, काल संध्याकाळी चाळीसगाव शहरातील सदानंद चौक या परिसरामध्ये एक महिला बुरखा घालून फिरताना काही नागरिकांना दिसली आणि बुरखा घातलेला असल्यामुळे या लोकांनी त्या महिलेवर संशय व्यक्त करून सदरील महिलेला पोलीस ठाण्यामध्ये आणून आमच्या स्वाधीन केलं. आम्ही त्या महिलेची चौकशी केली असता ती महिला खंडवा येथे राहणारी असून तिला कोणीही नातेवाईक नाही. म्हणून मिळेल त्या ठिकाणी काम करून आपला उदरनिर्वाह ती भागवत असते. तिला राहण्यासाठी घर नसल्याने ती फुटपाथवर झोपते. तिची संपूर्ण चौकशी करून या महिलेला जळगावच्या आशा महिला वस्तीगृहात दाखल केला आहे.
या घटनेनंतर पोलिसांकडून नागरिकांना आव्हान करण्यात आले की, कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता संशयित व्यक्ती जर आढळली तर त्या व्यक्तीला मारहाण न करता पोलिसांच्या स्वाधीन करा असं सांगण्यात आला आहे.