13 एकर जमीन हडपण्यासाठी जन्मदात्या आईचं जिवंत पणीच घातलं तेरावं; नाशकातील संतापजनक घटना.

”स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, ही म्हण प्रचलित आहे ती तेवढीच खरी सुद्धा , कारण आई आंनी मुल याचं नात हे खूप वेगळ असत आपला हदया पहिला ठोका आपण आईच्या पोटात असताना आपल्याला आईच्या हृदयातूनच मिळतो . जे आपल हृद्य स्पंदन देत ती आपली आई असते , मात्र याच आईची कधी कधी खूप परवड होत असते , नाशिक मधून हृद्य द्रावक घटना समोर येत आहे . पोटच्या मुलांनी वयोवृद्ध आईचं तिच्या लेकांनी जिवंतपणीचं दहावं आणि तेरावं घातलं आहे.
नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील निमगाव येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका वयोवृद्ध महिलेचं तिच्या लेकांनी जिवंतपणीचं दहावं आणि तेरावं घातलं आहे. संबंधित महिला एका वृद्धाश्रमात राहते. आई घरी नसताना मुलांनी तिचं दहावं आणि तेरावं घातलं आहे. मुलांनी केलेल्या कृत्याची माहिती मिळताच संबंधित महिला बेशुद्ध झाली होती. मात्र, आता त्यांची प्रकृती चांगली आहे.
त्या माऊलीच नाव कमलाबाई हिरे नाव आहे. त्या सध्या कळवण सप्तशृंगी अनाथाश्रमात वास्तव्याला आहेत. मागील दोन महिन्यांपासून त्या इथे राहत आहेत. दरम्यान, कमलाबाई हिरे यांच्या मुलां त्या मृत असल्याचं दाखवून जिवंतपणीच त्यांच दहावं आणि तेरावं घातलं आहे. कमलाबाई यांच्यावर नावावर १३ एकर जमीन आहे, ही जमीन हडपण्यासाठीच मुलांनी आपल्याला मृत घोषित केलं असावं, अशी माहिती कमलाबाई हिरे यांनी दिली आहे.
संपत्ती साठी असा वागण हे अत्यंत चुकीच आहे , आई वडील हे दोघे आपल्या २,३ लेकराचा सांभाळ आनंदाने करतात त्यांना लहानच मोठ करात पण दोन आई वडील म्हातारपणी याच मुलांना जड होतात , या आईने आता प्रशासनाला विनती केली आपला मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने आपल्या मृत्यूचा दाखला मुलांना देऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली आहे. १३ एकर जमिनीसाठी आपल्या जन्मदात्या आईचं अशाप्रकारे दहावं आणि तेरावं घातल्याची बाब उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.