प्रेयसीने लग्नाचा हट्ट करताच पहा प्रियकराने तिच्यासोबत काय केले ?

दिल्लीमधील आफताफचे प्रकरण जुने झाले नव्हते तेच अजून एक क्राईम व्हिडिओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे. एक तरुणी आपल्या प्रियकराकडे लग्नासाठी हट्ट करत होती आणि याचाच राग येऊन तिचा प्रियकर तिला बेदम मारहाण करतो सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
आपण जर हा व्हिडिओ पाहिला तर आरोपी तरुण हा मुलीचा अंगावर लाथा मारताना दिसत आहे. त्याचप्रमाणे तिच्या चेहऱ्यावर देखील त्याने लाथा मारून दुखापत करतो या व्हिडिओमध्ये तो मुलीवर अत्याचार करतानाही दिसतो मुलीला मारहाण केल्यानंतर तो तिला जमिनीवरून उचलतो मात्र त्याच्या झालेल्या या मारहाणीमुळे ती मुलगी बेशुद्ध झालेली असते.
यामध्ये मिळालेली माहिती अशी की, या व्हिडिओमध्ये जे युवक आणि युवती आहे या दोघांचे खूप दिवसापासून प्रेम संबंध आहेत आणि ही मुलगी आपल्या प्रियकराकडे लग्नासाठी हट्ट करत होती आणि प्रियकराला राग आल्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले याबाबत पोलिसांना माहिती होताच पोलिसांनी आरोपी प्रियकराला ताब्यात घेतले आणि चौकशी करून सोडून देखील दिले आहे.
सदरील युवक हा मध्य प्रदेशातील रहिवासी आहे युवती व युवक यांच्यामध्ये प्रेमाचे संबंध होते या व्हिडिओमध्ये मारहाण झालेल्या युवतीचं वय 19 वर्ष आहे त्यांच्यामध्ये वाद झाला या युवतीच्या हट्टामुळे आरोपी प्रियकर प्रचंड संतापला आणि त्यानंतर तो चिडून प्रियसीच्या केसांना पकडतो व जमिनीवर फेकतो आणि मारहाण करत राहतो मारहाण करून झाल्यावर तिला तो पकडून जमिनीवर उभा करायला जातो पण याच्या मारहाणीमुळे ती बेशुध्द झालेली असते. नंतर तिला रुग्णालयात दाखल केले जाते. डॉक्टरांनी या मुलीवर उपचार केले आहेत पुढील तपास पोलीस करत आहेत मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी या व्हिडिओ पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत आहेत.