भयंकर ! वीज कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, बराच वेळ मृतदेह खांबावर लोंबकळत होता; नातेवाईकांचा आक्रोश.

असा मृत्यू कोणाच्याही नशिबात नसावा एका वीज कर्मचाऱ्यांचा अत्यंत भयावह असा मृत्यू झाला हा मृतदेह काही वेळ त्या खांबावरती तसाच लोमकळत होता वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञान अनिल गावित हे विजेच्या खांबावरती काम करत असताना अचानक वीजपुरवठा सुरू झाला आणि त्यामुळे त्यांचा यामध्ये मृत्यू झाला,अनिल फत्तेसिंग गावित असं या वीज वितरण कर्मचाऱ्याचं नाव आहे. या घटनेनंतर बराच वेळ कर्मचाऱ्याचा मृतदेह खांबावर लोंबकळत होता. यासंदर्भात नातेवाईकांनी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला. आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.
वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ असणारे अनिल गावित विजेच्या खांबावर काम करत होते. परंतु अचानक वीज प्रवाह सुरू झाल्याने शॉक लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे काम करत असताना यासाठी फोन परमिट घेण्यात आलं होतं. त्यानंतर वीजपुरवठा बंद करण्यात आला त्यानंतर वीज प्रवाह कसा सुरू झाला, याचं नेमकं कारण काय? याची चौकशी होणं गरजेचं आहे. नवापूरमधील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील ग्रामीण एक मधील गावित वरिष्ठ तंत्रज्ञ असल्याची माहिती वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ अभियंते हेमंत बनसोड यांनी दिली आहे. या संदर्भात सखोल चौकशी केली जाणार आहे.मृत्यू झाल्यानंतर त्या घटनेची दखल घेऊन मृतदेह खांबावरून खाली घेणं गरजेचं होतं.
पण या घटनेनंतर बराच वेळ अनिल गावित यांचा मृतदेह खांबावर लोंबकळत होता. यासंदर्भात गुडफॉमचे काम करणाऱ्या कामगारांनी सब स्टेशनला कळवले. त्यानंतर घटनास्थळी नवापूर वीज वितरण कंपनीचे कर्मचारी दाखल झाले. तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवलेली होती. व त्याचा मृतदेह विद्युत खांबावर लोंबकळत होता. त्यामुळे वीज वितरण विभागाचा असंवेदनशीलपणा दिसून येतो. त्यानंतर १०८ रुग्णवाहिकेला स्थानिकांनी पाचारण करून वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी प्रचंड आक्रोश केलाअनिल गावित यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. घरातील कर्तापुरूष गेल्याने गावित परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विसरवाडी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील व चिंचपाडा पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. चिंचपाडा पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक बळवंत वळवी यांनी पंचनामा केला. पुढील कारवाई पोलीस करीत आहे.