पाथर्डीत कॉग्रेसच्या वतिने एसटी महामंडळाला जुने स्टॅण्ड व नविन बस स्टॅण्ड वर सिसिटिव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत असे निवेदन देण्यात आले – नसिरभाई शेख.

पाथर्डी प्रतिनिधी वजीर शेख,
पाथर्डी मधील जुने बस स्थानक व नवीन बस स्थानक या ठिकाणी तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे या मागणीसाठी पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटीचे वतीने पाथर्डी आगार प्रमुख व अधिकारी यांच्या बरोबर बैठक घेऊन तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे अशी मागणी निवेदन देऊन करण्यात आली.
पाथर्डी शहरातील जुने बस स्थानक व नविन बस स्थानक येथे प्रवाशांची नेहमी गर्दी असते या ठिकाणी नेहमी चोरांचा व पाकीटमारांचा सुळसुळाट असतो आजपर्यंत अनेक नागरिकांची पैसे, दागिने चोरीला गेले नेहमी लोकांचे पाकिटे मारले जातात. महिला प्रवाशांची दागिने हिसकावून घेतले जातात वेळप्रसंगी दमदाटी करून प्रवासांना लुबाडले जातील हे प्रकार सर्रास घडत आहेत.
प्रवासी वर्ग हा अत्यंत त्रस्त असून भीती खाली याकरिता सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अत्यंत महत्त्वाचे आहे व आवश्यक आहे , तसेच येत्या काही दिवसात आषाढी एकादशीची पंढरपूरला यात्रा असल्याने याविषयी अत्यंत गंभीरतेने पावले उचलण्याची गरज आहे याकरिता पाथर्डी आगाराचे व्यवस्थापक मा.पटेल साहेब यांच्याबरोबर बैठक घेऊन चर्चा केली व तशी तशा मागणीचे निवेदन देण्यात आले, जर तातडीने ही मागणी पूर्ण झाली नाही तर अत्यंत तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
याप्रसंगी पाथर्डी तालुका काँग्रेस अध्यक्ष नसीर शहानवाज शेख,जिल्हा काँग्रेस सरचिटणीस काटे सर काँग्रेस तालुका अध्यक्ष गणेश दिनकर सेवादल काँग्रेस तालुका अध्यक्ष डांगे सर, ओबीसी काँग्रेस तालुका अध्यक्ष संजय कराड सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष सुनील दौंड , ओबीसी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस सूर्यभान गरजे,तालुका काँग्रेस संघटक अनिल साबळे तालुका काँग्रेस उपाध्यक्ष जुनेद पठाण पाथर्डी शहर काँग्रेस उपाध्यक्ष आकाश काळोखे ,पाथर्डी तालुका काँग्रेस उपाध्यक्ष प्रशांत मगर, युवा नेता राहुल ढाकणे ,युवा नेता दत्ता मोरे अल्पसंख्याक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष युसूफ खान, अल्पसंख्यांक काँग्रेस जिल्हा रथ सरचिटणीस मोहम्मद भाई,अल्पसंख्यांक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष जब्बार आतार, तालुका काँग्रेस सरचिटणीस तसेच एसटी कामगार संघटनेचे नेते बाळासाहेब सोनटक्के हि उपस्थित होते, ज्ञानेश्वर भावड आदीसह अनेक सहकारी उपस्थित होते.