मनोरंजन

लग्न लागत असताना भरमंडपात असं काही घडलं की, लोकांच्या पायाखालची जमीनच घसरली..

घरातील एका व्यक्तीचं लग्न ठरतं असत पण संपूर्ण कुटुंब या उत्साहात सहभागी व्हायला तयार असतो. हे आपण अनेकदा पहिले असेल जेव्हा घरामध्ये एका व्यक्तीचं लग्न ठरतं असत तेव्हा संपूर्ण कुटुंब या उत्साहात सहभागी व्हायला तयार असतो. साखरपुड्यापासून ते लग्नाची वरात मंडपात जाण्यापर्यंत प्रत्येकाचा उत्साह खूप असतो. नवरा – नवरी एकमेकांना हार घालताना, सात फेरे घेताना, अगदी मंगळसूत्र आणि भांगेत कुंकू भरताना देखील अनेक जण दोन्ही जोडप्याचे क्षण अगदी आनंदाने बघत असतात.

सोशल मीडियावर अशीच एक घटना घडली आहे; या व्हिडीओत लग्न विधी बघणाऱ्यांसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. हा व्हायरल व्हिडीओ गावाकडचा आहे. गावातील घराच्या माळदावर मंडप बांधला आहे. लग्न विधी त्याचठिकाणी सुरु आहे, नवरा – नवरी टेरेसवर बांधलेल्या एका सुंदर मंडपात बसले आहेत. तसेच त्याठिकाणी उपस्थित असणारा अनेक जण हा लग्न सोहळा अगदी उत्साहाने पाहत आहेत. आणि अश्यातच त्याठिकाणी काही मुलं आल्याचे दिसत आहे आणि बघता-बघता टेरेसचा डाव्या बाजूचा काही भाग अचानक खाली कोसळतो. तसेच तिथे उभे असलेले सगळेच जण एकामागोमाग एक थेट खाली पडतात आणि हे पाहून कोणाच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

https://www.instagram.com/reel/DKtl21LIBLO/?utm_source=ig_web_copy_link

लग्नाच्या विधी पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. अन, एकाग्र होऊन लग्न सोहळा बघत असताना जर अचानक काही अनपेक्षित काही घडले तर कोणालाही धक्का बसू शकतो. असाच काहीसा धक्का या मंडळींना बसलेला आपल्याला दिसत आहे. अज्ञात व्यक्ती लग्नाचा व्हिडीओ शूट करत असल्याचे दिसत आहे. अचानक मंडपाच्या डाव्या बाजूला उभे असलेले छत कोसळल्याने लोक थेट खाली पडतात. टेरेसवरून पडल्यावर ते एमकेकांच्या अंगावर पडले. पण, कोणत्याही व्यक्तीला इजा झाली नाही असे दिसून येते आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @ankit_.000__ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. एवढी भयानक घटना घडली तरीही नेटकरी या व्हिडीओवर मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून आले आहेत. एक म्हणतोय की, ” कॅमेरामॅनला कधीच दुखापत होत नाही”, ” कॅमेरामॅन नाही याला लकी मॅन म्हणतात” , ” नशीब मंडप टेरेसच्या मधोमध बांधला होता, नाहीतर नवरा-नवरी सुद्धा खाली पडले असते” ; आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत…

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Back to top button

Share this news instead of copying!