मे. शिवाजी पठाडे यांना दोन राष्ट्रीय सन्मान – ‘नॅशनल आयकॉन अवॉर्ड 2025’ व ‘राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2025’ ने सन्मानित.

नवी दिल्ली | 10 जुलै 2025 – समाजसेवा व पर्यावरण रक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल मेजर शिवाजी पठाडे यांना दोन प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
प्रथम, “राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2025” (Rashtriya Gaurav Puraskar) हा सन्मान YSS Foundation तर्फे दिला गेला. हा पुरस्कार त्यांना त्यांच्या देशासाठीच्या उल्लेखनीय सेवेबद्दल, पर्यावरण संवर्धनातील कार्यासाठी, तसेच समाजात सकारात्मक बदल घडवण्याच्या कार्यासाठी प्रदान करण्यात आला. सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या समितीने तपासून हा पुरस्कार देण्यात आला असून, यामागे राष्ट्रीय सन्मान आणि विश्वासार्हतेचा ठाम आधार आहे.
दुसऱ्या सन्मानामध्ये, “नॅशनल आयकॉन अवॉर्ड 2025” (National Icon Award 2025 – Season 9) यासाठी त्यांची निवड करण्यात आली. 10 जुलै रोजी पंतप्रधान संग्रहालय, टीन मूर्ती मार्ग, नवी दिल्ली येथे आयोजित या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन ‘The Bharat News’ व ‘Bharati Yuva Welfare Association (India)’ यांनी केले होते. या कार्यक्रमात देशभरातील ग्रामीण व झोपडपट्टीतील खऱ्या नायकोंाचा सन्मान करण्यात आला, जे आपल्या कार्यातून देशासाठी झटत आहेत.

मेजर शिवाजी पठाडे यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पर्यावरण संरक्षणासाठी लाखो देशी झाडांचे वृक्षारोपण व संवर्धन केले आहे. त्यांचा कार्याचा आवाका सामाजिक, पर्यावरणीय आणि राष्ट्रसेवेसाठी समर्पित आहे.
या दुहेरी सन्मानामुळे मेजर पठाडे यांचे कार्य अधिक व्यापक स्तरावर पोहोचले असून, अनेक नव्या पिढ्यांना प्रेरणा मिळत आहे. त्यांचे कार्य हे खरे अर्थाने “सेवा परमो धर्मः” या तत्त्वाचे जिवंत उदाहरण ठरले आहे.