उन्हाळी परीक्षांच्या पूर्वसंध्येला ” कृष्णाली फाउंडेशनचा ” स्तुत्य उपक्रम.

खा.निलेश लंके यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना वाटले मोफत शैक्षणिक पॅड.
बहुधा मार्च किंवा एप्रिल या महीन्यांमध्ये प्राथमिक तथा माध्यमिक शाळांमध्ये परीक्षा होत असतात आणि हेच लक्षात घेत कृष्णाली फाउंडेशन यांच्याकडून शैक्षणिक बांधिलकी जोपासत १००१ विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक पॅड वाटण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन कर्जुने खारे जिल्हा प्राथमिक शाळा येथे नगर – दक्षिणेचे खा.निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्ये सर्व विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक पॅड देण्यात आले.

सध्याच्या काळात इंग्लिश मिडीयम स्कुलचे प्रमाण खूप वाढले आहे पण प्रत्येक पालक आपल्या मुलाचा प्रवेश इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये नाही करू शकत म्हणून ते मराठी शाळांमध्ये आपल्या मुलांना प्रवेश देत असतात सर्वसामान्य कुटुंबातील मुले आजही जिल्हा प्राथमिक शाळेमध्ये शिकत आहेत आणि आज मुलांमध्ये आपण एक चांगला उपक्रम राबवावा या उद्देशाने कृष्णाली फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत पाटील शेळके यांनी हा उपक्रम हाती घेतला असून या अनुषंगाने नगर जिल्ह्यातील आणि तालुक्यातील अनेक वेगवेगळ्या शाळांमध्ये शैक्षणिक रायटिंग पॅड मोफत वाटणार आहेत.

खा.निलेश लंके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, ” माझा सगळ्यात आवडता उपक्रम आज प्रशांत पाटील शेळके यांनी राबवला आहे. ही मुलं देशाच्या पुढील दोन पिढ्या आहेत, त्यांना काय हवं काय नको हे पाहणं आपली जबाबदारी आहे, ” कृष्णाली फाउंडेशनच्या उपक्रमाचे त्यांनी भरभरून कौतुक केले. आपण आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांची मदत करण्याचा नेहमी प्रयत्न असेल, शैक्षणिक क्षेत्र तसेच आरोग्य, महिला सक्षमीकरण तसेच पर्यावरण यावर मोठ काम करण्याचा फाऊंडेशनचा उद्देश आहे अस मत अध्यक्ष प्रशांत पाटील शेळके यांनी व्यक्त केलं.

यावेळी खा.लंके यांचे निकटवर्तीय ॲड राहुल झावरे, अशोक रोहकले, तसेच कृष्णाली फाउंडेशन उपाध्यक्ष अमोल शिंदे, लोकहित वादी प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अंकुश शेळके, सचिव प्रियंका पाटील शेळके, श्रीकांत बोरुडे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलास लांडे, जि. प.प्राथ.शाळा कर्जुनेखारे श्री. नरवडे बबन सर(मुख्याध्यापक), श्रीम. येणारे अलका मॅडम, श्रीम. देशमुख सुप्रिया मॅडम, श्रीम. गुंडू वैशाली मॅडम, श्रीम. नरोटे सविता मॅडम, श्रीम. शिंदे मंदाकिनी मॅडम, सुमित दरंदले कार्यक्रमाला उपस्थित होते

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देशमुख मॅडम यांनी केलं तर आभार प्रदर्शन प्रियंका पाटील शेळके यांनी केल.