पोळ्यानिमित्त एका शेतकऱ्याने तब्बल एवढा रुपयांची बैलजोडी खरेदी केली, पहा बातमी सविस्तर.

शेतकऱ्यांचा मित्र म्हणून बळीराजाला संबोधलं जातं वर्षभर हा बळीराजा आपल्या शेतकऱ्यांसोबत काम करत असतो ऊन वारा पाऊस या सगळ्यांमध्ये तो त्याच्यासोबत उभा असतो आणि याच बळीराजा बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक हक्काचा दिवस असतो तो म्हणजे बैलपोळा या बैलपोळ्याच्या दिवशी आपल्याकडे सर्वात भारी महागडे आणि सर्वांचे आकर्षण ठरतील अशा बैलजोड्या असायला हव्यात असं अनेकांना वाटतं आणि यासाठी काही लोक हौशी देखील असतात आणि याचा हौशिला काही मोल असतं असं म्हटलं जातं म्हणूनच तर पाथर्डीतील या पठाण तब्बल तीन लाखाची बैलजोडी खरेदी केल्या.
आजच्या युगात शेती मशागतीसाठी यांत्रिक अवजारे उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांचे आपल्या भरवशाच्या जीवलग साथीदार बैलांवरील प्रेम व विश्वास कमी झाला नाही. सदर विक्रमी 3 लाख 61 हजार रुपयांची बैल जोडी विकणारे शेतकरी हे तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथील सादीक मकबुल शेख हे आहेत.
शेतकरी हे अहमदनगर येथील अशोक शेळके हे आहेत. त्यांनी एका शेतकऱ्याने आज 3 लाख 61 हजार रुपयांना उच्चांकी भावाने बैलाची जोडी खरेदी करत सजवलेल्या बैलाची डीजेच्या तालावर गुलालाची उधळण करत वाजत-गाजत मिरवणूक काढली.यावेळी ही मिरवणूक पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी व शहरातील तसेच आठवडे बाजारासाठी आलेल्या तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली.
शेतकऱ्यांचा महत्वाचा समजला जाणारा बैलपोळा सण जवळ आला आहे . या पार्श्वभूमीवर पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीतील आठवडे बाजारात बैलांची मोठी खरेदी विक्री होत आहे.