काळीज पिळवटून टाकणारी घटना, वडिलांच्या डोळ्यासमोरच पाच वर्षाच्या चिमुकल्यासोबत घडलं असं काही !

लहान मुलं हे किती करामती असतात हे आपणा सगळ्यांना माहित आहे. लहान मुलं ही देवाघरची फुले असे म्हटले जाते. या लहान मुलांमध्ये खूप हट्टी स्वभाव पण असतो. एखादी गोष्ट आवडल्यास ती गोष्ट करण्यासाठीचा हट्ट धरला जातो. खेळणी असेल, गाड्या असतील, मोबाईल, टीव्ही यासाठी सुद्धा जास्त आकर्षित असतात. आपल्या घरातला कोणी व्यक्ती जर समजा बाहेर जात असेल तर त्याच्या पाठीशी लागणे किंवा कोणी गाडी घेऊन जात असेल तर गाडीवर एक चक्कर मारून आणणे असा आग्रह आजकालची मुलं करत असतात.
लहान मुलांचे मन कोणीही तोडत नाही अशीच एक घटना घडली आहे एका दिनकर शिंदे नावाच्या व्यक्तीस पाण्याचा टँकर भरून आणायचा असतो म्हणून तो आपल्या मुलाला घेऊन ट्रॅक्टरवर बसवतो आणि पाणी आणायला म्हणून हे दोघेजण सोबत ट्रॅक्टरमध्ये व्यवस्थित बसतात व तो ट्रॅक्टर घेऊन निघतात पण त्यांचा मुलगा राघव याचा काही अंतर गेल्यानंतर ट्रॅक्टर वरून तोल जातो आणि तसंच तो खाली पडतो तो खाली पडल्यानंतर त्या बसलेल्या ट्रॅक्टरच्या पाठीमागील जे डाव्या बाजूचे चाक असते त्या चाकाखाली जाऊन दिनकर यांचा मुलगा राघव गंभीर जखमी होतो व त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतो.
राघव व त्याचे वडील हे ध्रुवनगर मधील राहणारे आहेत ते ध्रुव नगर मधील शिंदे चाळ याठिकाणचे रहिवासी आहेत. आपल्या मुलाची दुर्दैवी घटना त्या मुलाचे वडील दिनकर शिंदे यांच्यासमोर रविवारी घडली. ही घटना घडली त्यावेळेस ते स्वतः ट्रॅक्टर चालवत होते. शिवाजीनगर परिसरातील धृवनगर येथील बारा बंगला भागात शिंदे चाळ आहे. या चाळीत राहणारे शिंदे हे ट्रॅक्टरला पाण्याचा टँकर जोडून रविवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान आपल्या मुलाला घेऊन ट्रॅक्टरमध्ये निघतात. आणि त्यावेळेस हा सगळा प्रकार घडतो या झालेल्या दुर्घटनेमुळे संपूर्ण गृहनगर सह शिंदे चाळीचा परिसर हळहळ व्यक्त करत आहे व संपूर्ण परिसरामध्ये शोककळा व्यक्त केली जात आहे.
मुलाचा हट्ट हा त्या मुलाच्या जीवाशी हा किती महाग पडू शकतो याचे हे उदाहरण आहे आपण आपल्या मुलाचे हट्ट नक्की पूर्ण करा पण ते हट्ट पूर्ण करत असताना तेवढी सुरक्षितता काळजी देखील घ्या