पैशांसाठी करावी लागतेय जीवघेणी धावपळ; पोटाची खळगी भरण्यासाठी ती करते ” हे ” काम.
सोशल मीडियावर आपण अनेकदा पाहतो की, बरेच व्हिडिओ व्हायरल होत असतात ते व्हिडिओ पाहिल्यानंतर आपलं हृदय भरून येते. अनेक वेळा काही व्हिडिओमध्ये लोकांची गरीबी पाहून त्यांची परिस्थिती पाहून आपल्यालाही खूप वाईट वाटतं. मात्र या जगामध्ये असेही अनेक लोक आहेत जे आपल्या परिस्थितीतही मनसोक्त जगत असतात आणि आपण करत असलेल्या कामांमध्ये आनंद मानत असतात. नुकताच दोन मुलांनी केक साठी पैसे नव्हते म्हणून चक्क भाकरीवर मेणबत्ती लावून वाढदिवस साजरा केला होता असे असतानाच एका महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे.
गरीब परिस्थिती माणसाला कोणत्याही कामाची लाज वाटून देत नाही किंवा परिस्थिती कोणतेही काम करायला भाग पाडत असते. आणि असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे. सदरील व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या गरीबीशी संघर्ष करत आहे. असे दिसून येत आहे एवढा त्रास असतानाही तिच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून बरेच जण तिचं कौतुक करत आहेत. सोशल मीडिया वरती अनेक व्हिडिओ हे व्हायरल होत असतात ज्यात आपण पाहतो की लोकांना दोन पैशासाठी जीव घेणे संघर्ष करावा लागत आहेत. त्याचप्रमाणे ही महिला देखील असाच संघर्ष करत असल्याचे या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. हलाकीची परिस्थिती असतानाही तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र अजिबातही कमी झालेला दिसत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ नेटकर्याना खूप भावला आहे.
सदरील व्हिडिओमध्ये एक महिला स्टेशनवर उभी आहे त्या ठिकाणी थांबलेल्या रेल्वेतील प्रवाशांना खाद्यपदार्थ विकत आहे. ती ज्या डब्यातील लोक आवाज देतील त्यांच्याकडे धावत जाऊन त्यांना खाऊ विकत आहे. मात्र वेळ कमी असल्याने किंवा रेल्वे सुटायच्या भीतीने ती या डब्यापासून दुसऱ्या डब्यापर्यंत धावत जाताना दिसत आहे. आणि तिची हीच धावपळ पाहून एका प्रवाशाने तिचा व्हिडिओ शूट केला आहे. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील जे स्मितहास्य आहे ते कॅमेरा मध्ये कैद झाला आहे.
गरिबी आणि असाह्य अवस्थेत जीवन जगण्याची धडपड महिलेच्या चेहऱ्यावरील हास्य हे सर्व पाहून अनेक जण त्या महिलेचा कौतुक करत आहेत. व्हिडिओला आत्तापर्यंत एक लाखाहून अधिक लोकांनी पाहिले असून पाच हजाराहून जास्त लोकांनी लाईक देखील दिले आहेत. त्याचप्रमाणे या व्हिडिओला वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स देखील येत आहे. यामध्ये एका युजरने म्हटले आहे की, ” चोरी आणि भीक मागण्यापेक्षा कठोर परिश्रम केलेलं कधीही चांगलं.”