स्थानिक पत्रकाराला डॉक्टर कडून अश्लील भाषेत शिवीगाळ.
परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरात अत्यंत धक्कादायक असा प्रकार घडला आहे. देवानंतर डॉक्टर असं म्हटलं जातं कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टर हे देवदूत ठरले. डॉक्टरांच्या प्रती सन्मान प्रत्येकाच्या मनामध्ये उंचवला गेला. मात्र बऱ्याचदा डॉक्टरांच्या एखाद्या हलगर्जीपणामुळे रुग्णांचा जीव जातो आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे हातात जे काम आहेत त्या कामात कुचरपणा करतात आणि त्यामुळे अनेक विपरीत घटना घडतात. बऱ्याचदा रुग्णालयांमध्ये डॉक्टरांच्या हाताखाली शिकावू डॉक्टर असतात. त्यांच्याकडूनही चुका होतात काही वेळा रुग्णांची नातेवाईकांकडून डॉक्टरांवरती हल्ले केले जातात. रुग्णालयाची तोडफोड केली जाते या घटना घडत असतात. मात्र पाथरी शहरात एक वेगळी घटना घडली आहे.
डॉक्टरांना दवाखान्यात आलेला रुग्णांच्या नातेवाईकांसोबत वाद घातला. तर रुग्णाचा नातेवाईक पत्रकार आहे असं समजल्यास त्यांनी त्याला अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली असा व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. सायंकाळच्या सुमारास संबंधित पत्रकार असणारे रुग्ण आपल्या नातेवाईकांना घेऊन रुग्णालयात पोहोचले. सलाईन लावून देण्याची विनंती त्यांनी डॉक्टरांकडे केली. डॉक्टर प्रीतम सोमानी यांनी यावेळी त्यांच्यासोबत हुजत घालत त्यांना शिवीगाळ केली. ते स्थानिक पत्रकार आहेत असं समजल्यानंतर सदरील डॉक्टरांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. रुग्णाचे नातेवाईक पत्रकार असणे हा गुन्हा आहे का ?
या प्रकरणी आरोपी डॉक्टर सोमाणी यांच्या विरोधात फिर्यादी मदन भालेराव यांनी रात्री उशिरा गुन्हा नोंदवला आहे. शहरातील वैद्यकीय सेवेत असणारा डॉक्टर आणि पत्रकारांना केलेल्या अश्लील भाषेत यासगळ्याचा सर्व पत्रकारांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या वतीने प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आल आहे. देवदूत असणारा डॉक्टरांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकार बांधवांना अशी अपमानास्पद वागणूक देणे ही अत्यंत चुकीचा आहे. पत्रकार बांधवांच्या सोबत पत्रकारांचे खास काही कायदे सुद्धा आहेत पत्रकारांचे संरक्षण व्हावे पत्रकारांना त्यांचे काम करणं सोपं जावं यासाठी विशेष कायदे आहेत त्या अंतर्गत कठीण कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वत्र जोर धरू लागली आहे.