डोक्यावर कर्जाचा डोंगर, कसं फेडावं कळेना, आत्महत्या शिवाय पर्याय दिसेना पण अचानक असं घडले कि, त्याचं टेंशन मिटलं.

काही दिवसापूर्वी झालेल्या LOCK DOWN मुळे कर्ज फेद्नार्यांच्या नाकी नाऊ आले आहेत. चांगले चाललेले व्यवसाय तसेच चांगली नोकरी काही लोकांची हातातून निसटून गेलेली आहे. आणि यातच सर्वात जास्त चितेचा विषय आहे तो म्हणजे आपण त्यावेळी घेतलेले कर्ज आणि त्याचे हप्ते, दिवसमान खराब असल्याने बऱ्याच लोकांना नोकरी नाहीये आणि म्हणून कर्जाचे हप्ते फेडायचे कसे अशा प्रश्न निर्माण झाला आहे.
या सगळ्यामध्ये एखाद्यावर खूप मोठं कर्ज असेल, जे कर्ज तो परत करू शकत नाही व तसेच बँकेकडून नोटीसही आली असेल. एवढेच नाही तर इतर कुठूनही त्याला कर्ज मिळत नसेल तर त्याच्याकडे दोनच उपाय असतात. एकतर त्याला कुठून तरी लॉटरी लागावी किंवा नाहीतर त्याने आत्महत्या करावी.
अशी अनेक प्रकरणं आपण रोज पाहात असतो. केरळमध्येही असंच काहीसं घडलं आहे. जिथे कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या एका मासे विक्रेत्याने कर्ज घेतलेले होते आणि तो कर्ज तो फेडू शकत नव्हता. पण अचानक त्याचे दिवस पालटून जाणारी घटना त्याच्या आयुष्यात घडली आणि त्याचे मागचे दुखाचे दिवस आनंदाचे झाले. त्यामागचे कारण म्हणजे त्याला अचानक लॉटरी लागली आणि त्याच्या सर्व समस्या दूर झाल्या.
ही घटना केरळमध्ये असणाऱ्या एका मासे विक्रेत्यासोबत घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या व्यक्तीचे नाव पुंकुजू असून तो केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील मैनागापल्लीचा या ठिकाणचा रहिवासी आहे. या व्यक्तीने काही वर्षांपूर्वी घर बांधण्यासाठी बँकेकडून सुमारे आठ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. तेव्हापासून ते कर्ज फेडण्यास तो सक्षम नव्हता. हे कर्ज १२ लाख रुपयांवर पोहोचले होते.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या एक दिवसापूर्वीच बँकेने त्यांचे घर सील करण्याची नोटीस दिल्याने ते चांगलेच नाराज झाले होते. दरम्यान, नशिबाने असे वळण घेतले की त्याचे सर्व त्रास ते पाहून दूर झाले. बँकेने संलग्नीकरणाची नोटीस दिली त्या दिवशी दुपारी त्यांची लॉटरी लागली. त्याला काय वाटले ते कळले नाही, कामावरून परतताना त्याने लॉटरीचे तिकीट काढले आणि त्याच दिवशी बँकेची नोटीस आली. या व्यक्तीकडे एकूण ७० लाख रुपये आहेत.
लॉटरीची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबातील आनंदाने उद्या मारायला लागली. त्यांचा आनंद गगनात मावेना झाला. त्याला एवढी मोठी लॉटरी लागेल याची अजिबात कल्पना नव्हती. मात्र,आता लॉटरी लागल्यानंतर त्यांचे सर्व संकट दूर होतील. केरळ मधील या व्यक्तीची ही लॉटरी चर्चेचा विषय राहिली आहे.