अ.नगर ब्रेकिंग : नगरचे माजी स्वर्गीय खासदार यांच्या मुलांविरोधात अजामीनपात्र वॉरंट.
नगर शहरांमधून अत्यंत महत्त्वाची बातमी आता समोर येत आहे. नगर मधील नगर अर्बन बँकेचा जो घोटाळा आहे तो प्रचंड गाजत असून त्या बँके बाबतच्या अनेक ज्या घडामोडी घडतात त्या सर्वांना सर्वश्रुतच आहेत आणि त्यातच आता एक अशी बातमी समोर येत आहे की, नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल बँकेत झालेल्या सस्पेन्स खाते घोटाळ्यातील नवे आरोपी महानगरपालिकेचे भाजपचे माजी नगरसेवक सुरेंद्र गांधी व त्यांचे बंधू देवेंद्र दिलीप गांधी तसेच या गांधी बंधूंची चुलती संगीता अनिल गांधी यांच्याबाबत न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.
न्यायालयात सुनावणी असतानाही तिघेही गैरहजर राहिल्यामुळे या तिघांना अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे या महिन्याच्या 21 जून रोजी होणाऱ्या सुनावणी मध्ये या तिघांना उपस्थित राहा म्हणून सांगितले होते. नगर अर्बन बँकेच्या सस्पेन्स खात्यातून पंधरा धनादेश वटवले गेले असून यातून काही खाजगी व्यक्तींची कर्ज थकबाकी अदा केली गेली आहे.
अहमदनगर शहरातील नगर अर्बन बँक या मध्ये जे काही बेकायदेशीरपणे व्यवहार झाले होते त्याबाबत आरबीआयने या बँकेला पाच लाखाचा दंड देखील केलेला होता. आणि या बँकेमध्ये खात्यावरील गैरव्यवहार झाले होते त्याबाबतची चौकशी देखील करायला सांगितली होती. आधी या गांधी परिवारमधून कोणाचेही नाव नव्हते. त्यानंतर बँकेचा जेव्हां लेखाजोखा परीक्षण केले गेले व न्यायालयीन तपासणी केली गेली त्या वेळेस काही गोष्टी समोर आल्या. आणि यामध्ये गांधी परिवारातील सुरेंद्र, देवेंद्र बंधू तसेच त्यांची चुलती संगीता अनिल गांधी या तिघांचे नाव स्पष्ट झाले आणि त्यानंतर न्यायालयाने त्यांना आरोपी ठरवून समन्स देखील बजावला होता.
आणि म्हणूनच या तिघांनाही न्यायालयाच्या सुनावणीसाठी समोर न्यायालयात हजर रहावे लागणार होते, पण मागील तीन तारखेपासून यातील कोणीही न्यायालयीन सुनावणीसाठी हजर झालेले नसल्याने न्यायालयाने या तिघांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करून येत्या 21 जून रोजी होणाऱ्या सुनावणीस उपस्थित राहण्याचे बजावले आहे.