लोकशाहीवर जबरदस्त भाषण; हसून व्हाल लोटपोट, Video तुफान व्हायरल.
आतापर्यंत आपण अनेक प्रकारची वेगवेगळी भाषण पाहिली आहेत, ऐकले आहेत. लहान पासून तर मोठ्यांपर्यंतचे अनेक भाषणे सोशल मीडियावर व्हायरल होताना आपण पाहत आहोत. पण या बातमीमधील हे भाषण काही हटके आहे. हे भाषण अगदी काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आणि सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. यामध्ये एक चिमुकल्याच्या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. लोकशाही म्हणजे काय ? यावर या चिमुकल्याने भाषण केलं आहे आणि तुम्ही हे भाषण ऐकून हसून हसून लोट पोट व्हाल असा हा व्हिडियो आहे.
एका चिमुकल्याच भाषण करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल होताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, एक मुलगा जनतंत्र दिनाच्या शुभेच्छा देत असताना लोकशाहीवर भाषण करत आहे. चिमुकला म्हणतो कि, खरं तर आज लोकशाही दिन आहे. या दिवसापासून देशात लोकशाही सुरू झाली आहे. मला लोकशाही खूप आवडते, लोकशाहीमध्ये तुम्ही जे मनाला वाटेल ते करू शकता. अगदी कोणासोबत भांडू शकता, दोस्ती करू शकता, प्रेमाने राहू शकतात, पण मला तर मोक्कार धिंगाणा घालायला आवडतं, खोड्या करायला आवडतं, रानात फिरायला आवडतं, माकडासारखी झाडावर चढायला आवडतं.
असं केल्यामुळे माझे बाबा मला मारत नाही. कारण ते लोकशाही मानतात पण माझ्या गावातली बारकाली पोरं माझं नाव सरांना सांगतात. सर मग मला पायदळी तुडवतात, कधीकधी मला कोंबडा बनवतात आणि म्हणतात पोरा तुझं वागणं लोकशाहीला धरून नाही. पण खरच सांगतो माझ्यासारखा गरीब पोरगा तुम्हाला आख्या तालुक्यात भेटणार नाही हे बोलून तो त्याचं भाषण संपवतो.
हे भाषण चालू असताना समोर बसलेले लोक मोठ्याने हसू लागतात. आणि त्याच्या भाषणासाठी टाळ्या देखील वाजवतात. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओ लोकांच्या पसंतीस उतरत आहे. हा व्हिडिओ पाहून लोक वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट देखील करत आहेत. लोक व्हिडिओ अनेक वेळा पाहत आहेत चिमुकला त्याच्या भाषणामुळे चांगला चर्चेत आलेला आपल्याला दिसत आहे. तुम्हालाही हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा तसेच लाईक करायला विसरु नका.