खासदार निलेशजी लंके यांच्या अथक प्रयत्नांचे फलित, विरोधी आमदारांकडून मुख्यमंत्री यांना पत्र देऊन श्रेय घेण्याचा हास्यास्पद प्रयत्न.

१२ मार्च २०२५ रोजी लोकसभेत शून्य प्रहरात अहिल्यानगर शहरात नवीन वैद्यकीय महाविद्यालयासाठी खासदार निलेशजी लंके यांनी ठामपणे आवाज उठवला. त्यानंतर त्यांनी स्वतः आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेऊन सातत्याने पाठपुरावा केला. ११ एप्रिल २०२५ रोजी आरोग्य मंत्र्यांकडून खासदार लंके यांना लेखी पत्र प्राप्त झाले की अहिल्यानगरमधील प्रस्ताव योग्य वेळी विचारात घेतला जाईल.

मे २०२५ मध्ये जेव्हा काही विरोधी नेते हे महाविद्यालय दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा डाव करत होते, तेव्हा लोकनेते निलेशजी लंके यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या डावांचा पर्दाफाश केला. अखेर लोकनेते खासदार निलेशजी लंके यांच्या संघर्षामुळे व प्रामाणिक पाठपुराव्यामुळे हे वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहरातच निश्चित झाले. ही जनता वाचक आहे, निर्णय घेणारी आहे… काम कुणी केलं आणि केवळ श्रेय कुणी घेण्याचा प्रयत्न केला हे लोक ओळखून आहेत.
संलग्न पत्र ही ठोस साक्ष आहे की, अहिल्यानगरसाठीचा लढा लोकनेते खासदार निलेशजी लंके यांनीच दिला आणि जिंकला. विरोधी आमदारांकडून मुख्यमंत्री यांना पत्र देऊन श्रेय घेण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला आहे असे खासदार निलेश लंके यांच्याकडून सांगण्यात आले