महाराष्ट्रातील प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांची अजिंठा लेणीस भेट.

विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्रातील प्रसिद्ध हवामान तज्ञ व हवामानाचे गाडे अभ्यासक पंजाबराव डख यानी आज शनिवारी जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी आले होते यावेळी लेणी पाहून त्यांना खुप आनंद झाला व येथील कोरीव लेण्या व पैंटिंगच्या लेण्यांविषयि माहिती जाणून घेतली. यावेळी प्रगतीशील शेतकरी संतोष शिंदे यानी डख याना विचारण्यात आले कि साहेब आज पाऊस पडेल का त्यांनी सांगितले कि होय आज दुपारच्या सुमारास पाऊस पडेल तर तीन वाजेपासुन चालू झाला असून यामुळेच हवामान शास्त्रज्ञ पंजाबराव डख यांच्यावर शेतकरी यांचा पूर्णपणे विश्वासार्हता आहे असे यावेळी शिंदे यानी सांगितले.यावेळी त्यांचे स्वागत निवृत्त सहा. फौजदार पोपटराव कांबळे यांनी स्वागत केले. तर टि पॉइंट येथील दुकानदार यानी त्यांच्या सोबत सेल्फि घेऊन त्यांच्याशि संवाद साधला.यावेळी कैलास बावस्कर. योगेश शिंदे.शेख अय्यास , विनोद दामोदर . औरंगाबाद एसटी महामंडळचे अधिकारी व सोयगाव आगारातील कर्मचारी विसपुते आदी यावेळी हजर होते.