धक्कादायक : काळ्या रंगाचा नवरा म्हणून बायको रोज भांडते, वैतागून नवऱ्याने उचलले नको ते पाऊल…

नवरा बायको म्हंटले कि, आला रोजचा छोटा मोठा वाद. लग्नानंतर बायको वाघ आणि नवरा बिचारा कासव होत असतो. लग्नानंतर सर्व काही बायको म्हणेल तसे घरात चालत असते. घरातले सर्व काही तिच्या भरोश्यावर असते. घरातला करता करविता हा बाहेरचे कामे सांभाळीत असतो आणि घरातले सगळे बायको सांभाळत असते. पण हा असा संसार करत असताना नवरा बायकोचे वाद हे कायमच होत असतात. सांगायचे झाले तर अतिशय छोटा छोटा विषयावर देखील भांडण होत असतात.
या बातमी मध्ये देखील अतिशय क्षुल्लक कारणावरून वाद होतात आणि तो विषय असतो त्वचेचा रंग. या घटनेमध्ये बायको गोरी आणि नवरा काळा असल्यामुळे बायको त्या रंगावरून कायम त्या नवऱ्याशी भांडण करायची. आणि या सगळ्याला वैतागून नवरा एक मोठ पाऊल उचलतो.
बायकोच्या या रोजच्या भांडणाला वैतागून तो पोलीस आपत्कालीन नंबर वर फोन करतो. आणि त्याच्या बायकोच्या विरोधात तक्रार करतो. ” माझी बायको मला मी रंगाने काळा आहे म्हणून रोज भांडण करते.” अस तो पोलिसांना सांगतो. यानंतर पोलीस त्यांच्या घरी येतात व त्या दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात पण तो दोघे हि काहीच ऐकायला तयार नसतात. अखेर पोलीस अधिकारी त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन जातात. नवरा-बायको दोघांनाही सोहरामऊ पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. तिथं बराच वेळ त्यांची समजूत काढली. त्यानंतर कसेबसे दोघंही एकत्र राहायला तयार झाले. त्यांना एकत्र घरी पाठवण्यात आलं.
पोलीस ठाण्यातील एसओ अमित सिंह यांनी सांगितलं, नवऱ्याच्या काळ्या रंगावरून पती-पत्नीचा वाद होत होता. त्यानंतर दोघांना समजावून घरी पाठवण्यात आलं आहे. आता दोघामध्ये कोणताही वाद नाही उत्तर प्रदेश मध्ये सध्या नवरा बायकोचे भांडण सध्या जास्त प्रमाणात वाढले आहेत. ११२ हे सध्या गुन्ह्या पेक्षा नवरा बायकोचे जास्त भांडण सोडत आहेत.