शेतात एकटी असलेल्या महिलेस केली बेदम मारहाण; आणि तिच्यासोबत घडले असे काही.
आजकाल सगळीकडे गुन्हेगारी वृत्ती वाढताना आपण सगळे पाहत आहोतच, कोणतेच शहर गुन्हेगारीत मागे नाही राहिले अशीच एक घटना छ. संभाजीनगर मध्ये घडली आहे. छ. संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 55 वर्षीय महिलेला शेतात एकटी गाठून तिला बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तिला मारहाण करून तिच्या अंगावरील दागिने व पिशवीतील रोख रक्कम घेऊन पळ काढला आहे. ही घटना जिकठाण शिवारात सोमवारी काल (ता.03) रोजी सायंकाळी घडली. दरम्यान या घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.
याघटनेबाबत मिळालेली माहिती अशी आहे की, औरंगाबाद जिल्ह्यातील जिकठाण येथील 55 वर्षीय महीला भाजी घेण्यासाठी शेतात गेली असताना ती शेताकडे एकटीच गेल्याचे पाहून एका आरोपीने तिला बेदम मारहाण करून तिच्या अंगावरील सोने व कमरेच्या पिशवीतील रोख रक्कम हिसकावून फरार झाला. ही घटना सायंकाळी 5 च्या सुमारास घडली. ही महिला जखमी अवस्थेतच गावात आल्यानंतर याबाबत काहींना सांगितले. यानंतर परिसरातील लोक जमा होत. 108 रुग्णवाहिकेला फोनवरून संपर्क करत जखमी महिलेला प्रथम वाळूज पोलीस ठाण्यात व नंतर घाटी रुग्णालयात दाखल केले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस उपायुक्त उज्वला वनकर, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात, वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन इंगोले, पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे,उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण बुट्टे आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून चौकशी केली. घरात संध्याकाळी जेवणासाठी भाजी घेण्यासाठी गेलेल्या महिलेचा अंदाज घेत तिच्यावर हल्ला करत चोरी केल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान त्या महिलेने हिम्मत दाखवल्याने त्याच्याबरोबर चांगलीच झटापट झाली. त्यामुळे पकडले जाऊन म्हणून आरोपीने तेथून पळ काढला. मात्र या झटापटीत आरोपीचा मोबाईल घटनास्थळी पडला.
पीडित महिला ही एकटीच असल्याने आणि शेतात उंच वाढलेली कपाशी असल्याने आरोपीने या महिलेला गाठून हल्ला केला. या हल्ल्यात आरोपीने अंगावरील दागदागिने व रोख रक्कम हिसकावली. तसेच यावेळी त्याने काही गैरकृत्य केले असल्याचाही संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या महिलेस वाळूज पोलिसांनी घाटीत दाखल केले आहे. तसेच पुढील तपास पोलीस करत आहे.