सोशल मीडियाचा वापर दिवसेंदिवस भरपूर प्रमाणामध्ये वाढलेला आपण पाहतो. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कंटेन असतात कॉमेडी व्हिडिओ असतात,असाच एक कॉमेडी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. केस कापण्यासाठी म्हणून एक व्यक्ती सलून मध्ये जातो, सलून मध्ये गेल्यानंतर तो केस कापायला बसतो आणि ढसाढसा रडायला लागतो. ही केस कापण्यासाठी गेलेली व्यक्ती आपले केस कापले जात आहेत म्हणून रडत नाहीये तर चक्क म्युझिक सिस्टीम वरती जे गाणे चालू आहे ते ऐकून रडत आहे. बहुदा बऱ्याच सलून मध्ये टाईमपास होण्यासाठी गाणी लावलेली असतात असंच या सलून मध्ये देखील गाणं लावलेलं होतं आणि जेव्हाही व्यक्ती केस कापायला बसते त्याचवेळी एक इमोशनल गाणं चालू होतं आणि या व्यक्तीला ते इमोशनल गाणं इतकं मनाशी लागलं की, तो स्वतःला आवडू शकला नाही आणि त्याला रडू कोसळलं.
त्या सलून मध्ये आधीपासूनच गाणी चालू असतात आणि नेमकं हा केस कापण्यासाठी बसतो आणि एक गाणं चालू होतं. ते गाणं चालू होतात तो रडायला लागतो आणि जो केस कापणार असतो तो केस कापत असताना केस कापायची सोडून देतो आणि जोरात हसायला लागतो. जेव्हा हा व्यक्ती रडायला लागतो ते रडताना पाहून तुम्हाला मात्र हसू आवरणार नाही हे नक्की
प्रेम म्हटलं की तुमच्यासमोर अनेक गोष्टी येतात अनेक वेगवेगळ्या गोष्टी डोळ्यासमोर येतात. मात्र प्रेम म्हटलं की धोका देखील आलाच. अनेकदा प्रेमामध्ये अनेकांना धोका मिळतो प्रेम एकावर लग्न दुसऱ्याशी अनेक गोष्टी घडतात.आणि त्यावर निगडित अनेका सिनेमे अनेक गाणे देखील आहेत. ज्यांना प्रेमात धोका मिळाला ती लोक मानसिकरित्या खचून जातात. अत्यंत भावनिक होतात मग एखाद्या सिनेमाचा किंवा एखाद्या संगीताचा आधार घेतात अनेकांच्या आयुष्यामध्ये असे पेज प्रसंग येत असतात. मात्र कोणत्या ठिकाणी कस रिऍक्ट व्हायचं हे आपल्या वरती अवलंबून असतात. हा पट्ट्या सलून मध्ये गेला आणि त्याने मात्र भलतंच काही केलं. सलून मध्ये दर्दभरे गाणं सुरू होता. याला काही राहवलं नाही गाणं सुरू झालं आणि हा ग्राहक ढसाढसा रडू लागला त्याच्या रडण्याचं कारण काय आहे पहा सविस्तर व्हिडिओ मध्ये.